Mumbai Crime News : OLX वर खरेदी विक्री करण्याच्या नावाखाली करोडो रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर गुन्हेगार टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मुंबईच्या सायबर सेलने परराज्यातून या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 2 लाख रोख रक्कम, 9 मोबाईल फोन, 32 डेबिट कार्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय.  


याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओएलेक्सवरून फसवणूक झालेल्या काही तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन सायबर सेलने याबाबतचा तपास सुरू केला. त्यासाठी सायबर पोलिसांची काही पथके देखील तयार करण्यात आली. पोलिसांनी मुंबईतील 10 गुन्हे तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी राजस्थान आणि उत्तरप्रदेश येथील चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आतापर्यंत शेकडो लोकांची फसवणूक केली असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. 


 मुंबई पोलिसांनी याबाबत अधिक तपास केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या आरोपींनी OLX च्या नावाने फसवणूक तर केलीच आहे. परंतु, सेक्शटोर्शनचीही मोडस ओप्रेडी समोर आली आहे. या टोळीने मुंबईत असे 11 गुन्हे केले आहेत. या सर्व 11 गन्ह्यांचा मुंबई पोलिस कसून तपास करत आहेत. या टोळीसोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? फसवणूक सोडून आणखी काही गुन्हे या टोळीने केले आहेत का? याचा देखील पोलिस कसून तपास करत आहेत. 


Mumbai Crime News :  असा झाला भांडाफोड 


मुंबई पोलिसांनी एका तक्रारीवरून या टोळीचा पर्दाफाश केलाय. मुख्य तक्रार देणाऱ्या फिर्यादीची सुरतहून मुंबईला बदली झाली होती. संबंधित व्यक्तीने फर्निचर विक्रीसाठी OLX वर जाहीरात दिली होती. या जाहिरातीचा फायदा घेऊन आरोपींनी तक्रादाराची फसवणूक केली. त्यानंतर सबंधितांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने याबाबत कसून तपास केल्यानंतर आरोपींबाबत धागेदोरे हाती लागले. खोलात जाऊन तपास केल्यानंतर फसवणूक करणारे आरोपी हे राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने दोन्ही राज्यांतून चार आरोपींना बेड्या ठोकल्या. 


महत्वाच्या बातम्या


मुंबई आयआयटीतील मुलीचा पोलिसाकडून विनयभंग, नवी मुंबईतील पाम बीचवरील धक्कादायक घटना