Mumbai Crime News : छोटा शकीलचा (Chota Shakeel ) साडू सलीम फ्रुट (Salim Fruit  ) याला पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. मुंबईतील अनिवासी भारतीय असलेल्या एका व्यक्तीच्या मालमत्तेची खोटी कागदपत्रे बनवून सुमारे 25 करोड रुपयांची मालमत्ता बळकावली होती. यावर अनिवासीय भारतीय फिर्यादी अहमद युसुफ लम्बात यांनी मुंबई पोलिसात तक्रार दिली होती. याबाबतचा तपास करत असताना पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये सलीम फ्रुट याचा देखील  समावेश आहे.  
 
मुस्लिम असगरअली उमरेटवाला ( वय 62 ),  शेरझादा जंगरेज खान (63 ), अस्लम अब्दुल रेहमान पटनी (56), रिजवान अलाउद्दीन शेख (35) आणि सलीम फ्रुट अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बनावट कागदपत्रे बनवून ती सह दुय्यम निबंधक, मुंबई शहर क्र. 3 यांच्या कार्यालयात सादर केली आणि ही कागदपत्रे खरी असल्याचे भासविले. त्यामुळे फिर्यादी यांच्या वडिलांच्या मालकीची स्थावर मालमत्ता लम्बात बिल्डींग, उमरखाडी रोड, बाबुला टँक रोड, मुंबई- ज्याची सद्याची किंमत अंदाजे 25 करोड रूपये आहे. ही मालमत्ता या आरोपींनी बळकाविली होती, त्यामुले त्यांनी बनावट कागदपत्रे सादर केली.  


टेरर फंडिंगच्या आरोपाखाली सलीम फ्रुट याला एनआयएनं (NIA) काही दिवसांपूर्वी अटक केली होती. तो सध्या मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात होता. खोटी कागदपत्रे देऊन फसणूक करण्याच्या तक्रारीनंतर त्याला तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खंडणी विरोधी पथक मुंबई करत आहे.  


सलीम फ्रुट कोण आहे?
छोटा शकीलचा सलीम फ्रूट हा साडू असून तो छोटा शकीलच्या खूपच जवळचा आहे. छोटा शकीलच्या पत्नीच्या धाकट्या बहिणीशी सलीमचा विवाह झाला आहे. सलीमचे वडील उमर कुरेशी हे मुंबईतील नल बाजार परिसरात फळे विक्री करण्याचे काम करत. त्यामुळे सलीमला सलीम फ्रूट म्हणून संबोधले जाते. सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी या दोघांना एनआयएने अटक केली असून त्यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप आहे. याच आरोपाखाली सध्या सलीम मुंबईतील तळोज मध्यवर्ती कारागृहात आहे. येथून आज मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 


महत्वाच्या बातम्या 


भारतातील दहशतवादी कृत्यांसाठी डी कंपनीकडून रसद; एनआयएच्या आरोपपत्रात दावा