मुंबई : मुंबईच्या दहिसर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहिसर येथील रावळपाडा या ठिकाणी एका मित्राने आपल्या दोन मित्रांवर जीवघेणा हल्ला केला कारण त्यांनी जेवण रुचकर बनवलं नव्हतं. यामध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसर्‍याची प्रकृती चिंताजनक आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहिसर पूर्व येथील रावलपाडा येथे राजहंस बिल्डींग् कन्स्ट्रक्शनच काम सुरू होतं. यामध्ये तीन मित्र काम करत होते. 1 मार्च रोजी रात्री 10.30 च्या सुमारास जेवण रुचकर झालं नाही म्हणून तीन मित्रांमध्ये वाद झाला. जेवण नीट होत नाही म्हणून हे वाद नेहमी होत असे. मात्र 1 मार्च अलाहाबाद येथे त्या टोकाला पोहोचला की आरोपी विनोदने आपले दोन मित्र रविंदर नायक आणि कालीया नायक वय 27 या दोघांच्या डोक्यात खोरे मारले. दोघांनाही उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे उपचारादरम्यान कालिया नायकचा मृत्यू झाला तर रवींद्र नायक यांची प्रकृती चिंताजनक आहे.


हा जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपी विनोद तेथून पसार झाला आणि त्याच परिसरात तो लपून बसला. विनोद मुंबई सोडून पळून जायची संधी शोधत होता. मात्र पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याचा हा डाव फसला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि याचा छडा लावण्यास सुरुवात केली. अवघ्या काही तासातच पोलीसांनी विनोदला अटक करत त्याला बेड्या ठोकल्या.


राजहंस बिल्डिंगचे बांधकाम काम सुरू होते. त्या ठिकाणी हे तिघे तिथे काम करत होते. इमारतीच्या तळमजल्यावर एका पत्राच्या खोलीत राहत होते. जेवणावरून रोज त्यांची भांडण होत होती. त्यामुळे रोज होणाऱ्या या भांडणाला कंटाळून विनोदने हे पाऊल उचलल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.


पोलिसांनी या प्रकरणात आईपीसी कलम 302,307 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत,पोलीस उपायुक्त डी.स्वामी,सहायक पोलीस आयुक्त सुहास पाटील यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या केसचा तपास करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.