Mumbai Navy Gun Robbery : मुंबईच्या नेव्ही नगरमधून एक अतिशय खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात नेव्ही नगरमधून भरलेल्या इंसान रायफलची चक्क चोरी झाल्याची घटना घडली आहे. ज्यामध्ये तीन मॅगझिन आणि 40 राऊंडसह इंसान रायफलची चोरी करण्यात आली आहे. हि घटना घडल्यानंतर रायफलसह अनोळखी इसम बेपत्ता झाल्याने परिसरात सर्वत्र भीतीच वातावरण पसरलंय. घटनेची माहिती मिळताच कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांसह नौदलाकडून देखील या अज्ञात व्यक्तीचा तपास सुरू आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
जवान असल्याचे सांगत अज्ञात व्यक्तीकडून रायफल अन् तीन मॅगझिन चोरल्या
मिळालेल्या माहितीनुसार, कर्तव्यावर असलेल्या अग्नीवीरच्या हातातून भरलेली इंसान हि रायफल चोरीला गेलीय. नौदलाच्या शीघ्र कृति दलाचा जवान असल्याचा बनाव करून हि रायफलची चोरी करण्यात आली आहे. अग्निवीर कर्तव्यावर असताना नेव्हीच्या शीघ्र कृती दलाच्या वेशात आलेल्या या इसमाने जवानाला कर्तव्य मुक्त करण्याचा बनाव केला आणि त्याची इन्सास रायफल ताब्यात घेतली. या प्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नौदलाकडून देखील या व्यक्तीचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र या आरोपीला पकडणं हे पोलिसांच्या पुढचं मोठं आव्हान असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नौदलाच्या निवासी भागात 6 सप्टेंबर 2025 रोजी रात्री एका रायफल आणि दारूगोळा चोरी गेल्याची तक्रार करण्यात आली होती. नौदलाच्या गणवेशातील दुसऱ्या एका व्यक्तीने एका कनिष्ठ जवानाला असे सूचित केले की त्यालाही असेच काम करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. नंतर, या जवानाने ड्युटी स्वीकारणारा व्यक्ती रायफल आणि दारूगोळ्यासह त्याच्या पदावरून बेपत्ता असल्याचे आढळून आले. मुंबई पोलिसांच्या समन्वयाने हरवलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी शोध मोहीम सुरू केलीय. घटनेला कारणीभूत असलेल्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतर सरकारी संस्थांकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि भारतीय नौदल या प्रयत्नांना आवश्यक ती सर्व मदत करत आहे. असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आणखी वाचा