मुंबई : मरिन ड्राईव्हजवळील हॉस्टेलमध्ये झालेल्या 18 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला. या मुलींच्या हॉस्टेलमध्ये आधी धोबीचं काम करणाऱ्या आणि नंतर वॉचमनचं काम करणाऱ्या व्यक्तीने हे कृष्णकृत्य केलं आणि नंतर स्वतःचा जीवही दिला. ज्या मुलीची हत्या करण्यात आली आहे त्या मुलीने या प्रकरणातील आरोपी तिची छेडछाड करतोय अशी माहिती दिली होती. पण तशी आपल्याकडे तक्रार केली नसल्याची माहिती हॉस्टेलच्या वॉर्डनने दिली आहे. 


मरीन ड्राईव्ह हॉस्टेल बलात्कार आणि हत्या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे


- मयत मुलीने आरोपीकडून होणाऱ्या छेडछाडीची माहिती तिच्या मैत्रिणीला दिली होती.


- मात्र पीडितेने किंवा तिच्या मैत्रिणीने आरोपीकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली नसल्याचे वॉर्डनने पोलिसांना सांगितलं आहे. 


- पोस्टमॉर्टममधून मिळालेली प्राथमिक माहिती- गळा दाबल्यामुळे हत्या करण्यात आली आणि लेगिसचा वापर करून गळा दाबण्यात आला होता.


- चौथ्या मजल्यावर पीडित मुलगी एकटीच राहात होती. मंगळवारी रात्री हॉस्टेलमधून बाहेर जाण्याची रजिस्ट्री नव्हती आणि तिचा दरवाजा बाहेरुन बंद होता. नंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. 


- पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पीडितीचा शरीरावर जखमही होती. पोलिसांनी जेजे रुग्णलयात मृतदेह पाठवला होता. त्याचसोबत मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


- पोलिसांनी केलेल्या तपासात ही घटना सोमवारी रात्री 11.30 ते मंगळवारी पहाटे 4.45 च्या दरम्यान घडली होती. पीडित मुलीचा मैत्रिनीने तिला रात्री 11:30 वाजता शेवटचे पाहिले होते. 


- वसतिगृहातील सीसीटीव्हीमध्ये आरोपी ओमप्रकाश कनोजिया हा पहाटे 4:44 वाजता तेथून निघून गेला आणि त्याने पहाटे 4:58 वाजता चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. 


- पोलिसांना आरोपीच्या खिशात कुलुपाच्या चाव्या सापडल्या. त्यातील एक चावी ही त्या मुलीच्या रुमची होती. आरोपीने मुलीच्या रुमला कुलूप लावलं आणि चावी आपल्यासोबत घेतली.  


- पोलिसांनी आतापर्यंत हॉस्टेलमधील सात ते आठजणांचे जबाब नोंदवले आहेत. पुढील तपास आजून सुरू आहे.


- वसतिगृहातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नाहीत आणि शासकीय निविदा प्रक्रियेच्या आधारे तीन सुरक्षा रक्षक असायला पाहिजे होते. 


- पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपीचा आत्महत्येचा स्पष्ट हेतू होता. मात्र रात्रीच्या वेळी अंतर्गत दरवाजे बंद असतात, तो आत कसा गेला याची चौकशी सुरू आहे.


- पीडित आणि आरोपी दोघांचेही मृतदेह त्यांचा अद्याप कुटुंबीयांनी ताब्यात घेतले नाहीत. 


ही बातमी वाचा: