Mumbai Drug Case : क्रूझ ड्रग्स केस प्रकरणी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खानला (Aryan Khan)  मुंबईच्या सेशन कोर्टाच्या विशेष NDPS कोर्टाकडून जामीन मिळणार की, नाही? याचा निर्णय 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आर्यन खानसह इतर सर्व आरोपींची रवानगी आर्थर रोडच्या कारागृहात करण्यात आली आहे. आर्यन खानने एनसीबी (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी विश्वास दिला आहे की, आतापासून मी नवं आयुष्य सुरु करणार आणि चांगलं काम करुन नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करिन. 


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं समुपदेशन (काउन्सिलिंग) करण्यात आलं. त्यादरम्यान, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आर्यन खाननं आश्वासन दिलं आहे की, तो गरिबांचं कल्याण करण्यासाठी काम करणार असून यापुढे स्वतःच्या नावाला कलंक लागेल असं, काहीही वागणार नाही. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी सल्लामसलत केली. आर्यन खान म्हणाला की, त्याच्या सुटकेनंतर तो गरीबांसाठी काम करणार आहे. तसेच इथून पुढे कोणतंही चुकीचं काम करणार नाही. 


दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो केवळ ड्रग्स जप्त करुन कारवाई करत नाही, तर ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांचं काउन्सिलिंगही करतं. ड्रग्जमुळे होणारं शारीरिक, मानसिक नुकसान आणि समस्यांबाबत एनसीबीचे अधिकारी ड्रग्सच्या विळख्यात आलेल्या पीडितांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झोनल डायरेक्टर समीर वानखेडे स्वतः तरुणांची काउन्सिलिंग करतात. क्रूझ ड्रग प्रकरणी आर्यन खानचं काउन्सिलिंगी समीर वानखेडेंनी केलं.


कधी झाली अटक?


आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोवाला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.


'आर्यन खान कैदी नंबर-956' 


मुंबई ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानची चर्चा सगळीकडे चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान आणि गौरी खान सध्या आर्यनमुळे चिंतेत आहेत. आर्यनला आर्थर रोड येथील तुरूंगात ठेवण्यात आले आहे. त्याचा कैदी नंबर   N956 आहे. आर्यनला 20 ऑक्टोबरपर्यंत तुरूंगात राहावे लागणार आहे. त्यानंतर त्याच्या जामीनावर  निर्णय होणार आहे. काल त्याच्या जामीनाची सुनावणी पूर्व झाली. न्यायाधीशांनी 20 ऑक्टोबर पर्यंत निकाल राखून ठेवला आहे.  आर्यन आणि अरबाज मर्जेंटसह इतर आरोपींना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बरॅक नंबर एक मध्ये ठेवण्यात आले आहे.  बरॅक नंबर एकचा वापर कोरोना काळात आयसोलेशन वॉर्ड म्हणून करण्यात येत होता. जेव्हा नवा कैदी येतो तेव्हा त्याला एक आठवडा आयसोलेशन वॉर्डमध्ये म्हणजेच  बरॅक नंबर-1 मध्ये ठेवण्यात येते. एक आठवडा आयसोलेशन पूर्ण केल्यानंतर  ड्रग्स प्रकरणातील आर्यन खान आणि त्याच्यासह अटकेत असलेल्या इतरांना कोरोना चाचणी करण्यात आली. 14 तारखेला आर्यन आणि इतर सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर आर्यनला इतर कैद्यांसोबत शिफ्ट करण्यात येणार होते. पण सुरक्षेच्या कारणामुळे ड्रग्स प्रकरणातील आरोपींसोबत आर्थर रोड येथील तुरूंगाच्या बरॅकमध्येच ठेवण्यात आले.