विक्रोळी: गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणातून हत्या,मारहाण, गुन्हेगारीनं कळस गाठलाय. दरम्यान, विक्रोळी पश्चिमेच्या सुर्यानगर परिसरात पार्किंगच्या वादातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शाब्दिक वादाचं रुपांतर हत्येपर्यंत गेल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून तिघांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. पार्किंगवरून सुरु झालेला वाद हाणामारीत गेला. लोखंडी टेबल, लोखंडी पाईप, आणि हातातील कड्याचा वापर करत तिघांनी 41 वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेतच या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
शाब्दिक चकमकीला हत्येचं रुप
विक्रोळीच्या इस्लामपुरा नुराणी मस्जिदकडून जाणाऱ्या रस्त्यावर आर. आर. इंटिरिअर दुकानासमोर गाडी पार्क करण्यावरून वाद उफाळला. हा वाद सुरुवातीला शाब्दिक वादापुरता सीमित होता, मात्र त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी मोहम्मद तारिक जैनूर आब्दीन (34 वर्षे), कलिम मुनोवर खान (48 वर्षे), फुरकान इस्तियाक अहमद खान (19 वर्षे), आणि जीशान इस्तियाक अहमद खान (21 वर्षे) या चार आरोपींनी किताबउल्लाह शेख यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
प्राणघातक हल्ला, एकाची हत्या
मारहाणीत आरोपींनी लोखंडी टेबल, लोखंडी पाईप, आणि हातातील कड्याचा वापर केला. या प्राणघातक हल्ल्यात किताबउल्लाह शेख गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी जवळच्या महात्मा फुले रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. हा प्रकार परिसरात खळबळ निर्माण करणारा ठरला असून पार्किंगसारख्या किरकोळ वादातून जीवघेणा वाद होणे चिंतेची बाब असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आलाय.
अखिलेश शुक्लाला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट
मराठी माणसांविषयी गरळ ओकणारा आणि कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणारा सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) याला शुक्रवारी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर अखिलेश शुक्ला याच्याविरोधात एकापाठोपाठ एक कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. कल्याण उपप्रादेशिक परिवहन महामंडळाने अखिलेश शुक्ला याची खाजगी गाडी ताब्यात घेतली असून या गाडीला नऊ हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. (Kalyan Attack Marathi Family)
हेही वाचा: