Mumbai Crime News: मुंबईच्या (Mumbai) ताडदेव परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुंबईत मॅनेजमेंटचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या 20 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. कार्तिक (Kartik) असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा राजस्थानमधील (Rajasthan) जयपूरचा (Jaipur) रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कार्तिकच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक मुंबईतील ताडदेव परिसरातील आदित्य हाईट्स (Aditya Heights) या इमारतीत राहत होता. तो मुंबईत मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होता. काल रात्री इमारतीतून उडी मारून त्याने जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Mumbai Crime News: 12 व्या मजल्यावरील रेफ्युजी एरियातून उडी घेतल्याची माहिती
आदित्य हाईट्स या इमारतीच्या 12 व्या मजल्यावर रेफ्युजी एरिया आहे. याच ठिकाणाहून कार्तिकने उडी घेतल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. कार्तिकने हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणातून उचललं, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यातून घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Mumbai Crime News: वडील राजस्थानमध्ये मोठ्या सरकारी पदावर
घटनेनंतर कार्तिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील नायर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. कार्तिक हा मूळचा जयपूरचा रहिवासी असल्याने त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मृत विद्यार्थी कार्तिकचे वडील राजस्थानमध्ये मोठ्या सरकारी पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. मुलाच्या दुर्दैवी निधनाची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. कार्तिक मुंबईत शिक्षणासाठी राहत होता. त्याच्या भविष्यासंदर्भात कुटुंबीयांच्या अनेक अपेक्षा असताना घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या घटना
