Sunita Ahuja On Govinda: नव्वदच्या दशकातला सुपरस्टार अभिनेता गोविंदा (Govinda) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांपासून गोविंदाचे विवाहबाह्य संबंध (Govinda Extramarital Affair) असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यासाठी कारण ठरतेय, त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja). गोविंदाच्या बायकोनं त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. पण, गोविंदानं मात्र तिचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अलिकडेच गोविंदा एका नवोदित अभिनेत्रीसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झालेला, त्यामुळे पुन्हा एकदा गोविंदाबाबतच्या अफवांनी जोर धरला. गोविंदासोबत स्पॉट झालेली अभिनेत्री कोमल स्वर्णकार होती. त्यामुळे गोविंदाचं कोमलसोबत (Govinda Komal Swarnakar Viral Video) अफेअर सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं. अशातच या व्हिडीओवर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजानं संताप व्यक्त केला आहे. 

Continues below advertisement

गोविंदा (Govinda) आणि कोमल (Komal Swarnakar) यांच्यातील कथित अफेअरच्या चर्चा आणि तो व्हायरल व्हिडीओ यावर पॅपाराझींनी सुनीता आहुजाला प्रश्न विचारले, त्यावर बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला. सुनीता अहुजा नुकतीच स्पॉट झाली, त्यावेळी पॅपाराझींनी तिला गोविंदा आणि कोमल स्वर्णकार यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर प्रश्न विचारले. त्यावेळी सुनीता काहीशी चिडलेलीच दिसली. सुनीता अहुजाला विचारलं की, "गोविंदा आणि कोमल एकत्र दिसले, सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे का?"

गोविंदाच्या व्हायरल व्हिडीओवर संतापील सुनीता अहुजा (Govinda Komal Swarnakar Video)

Continues below advertisement

पॅपाराझींनी गोविंदा आणि कोमल यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर प्रश्न विचारला. त्यावेळी सुनीता अहुजा चिडली. त्यानंतर म्हणाली की, "तुम्ही ती म्हण ऐकलीय का? 'विनाशकाले विपरीत बुद्धी', त्याची बुद्धि भ्रष्ट झालीय... त्यामुळेच हे सर्व करतोय तो, काय बोलू आता?"

पॅपाराझींनी पुढे विचारलं की, "लोक म्हणतायत की, 'हिरो नंबर 1' आता 'चीटर नंबर 1' बनलाय..." तेव्हा सुनीता यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "मला याबद्दल गोविंदाच्या चाहत्यांना विचारायचंय, मी जेव्हा जेव्हा काही बोलते, तेव्हा ते मला का ट्रोल करतात? त्यामुळे गोविंदाचे फॅन्स आणि मीडियानं याचं उत्तर द्यावं. मला विचारू नका... मला यात काहीही रस नाही..."

'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? 

गोविंदा नुकताच मुंबई विमानतळावर एका तरुणीसोबत दिसला आणि गोविंदासोबत दिसलेली 'ती' कोण अशा चर्चांना उधाण आलं. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत, गोविंदासोबतची ती कोण? असे प्रश्न अनेकांनी विचारले. तर, गोविंदासोबत स्पॉट झालेली एक नवोदित अभिनेत्री आहे. तिचं नाव कोमल राणी स्वर्णकार (Komal Rani Swarnkar). सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं गोविंदा आणि कोमल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी गोविंदानं  काळी डेनिम जीन्स, पांढरा शर्ट आणि काळं जॅकेट वेअर केलेलं, तर कोमल पांढऱ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये दिसली. असा दावा केला जात आहे की, ही तीच मराठी अभिनेत्री आहे, जिच्यासोबत गोविंदाचं अफेअर असल्याच्या चर्चा आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral