Mumbai Crime : मुंबई : महाराष्ट्राची (Maharashtra News) राजधानी मुंबईतून (Mumbai) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑटोरिक्षाचं भाडं देण्यावरुन झालेल्या वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. या घटनेबाबत मुंबई पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, सोमवारी कुर्ला येथे ऑटोरिक्षाचं भाडं देण्यावरुन दोन लोकांमध्ये वाद झाला, त्यानंतर हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोरिक्षाचं भाडं देण्यावरुन झालेल्या भांडणात कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाची त्याच्या सहकाऱ्यानं हत्या केली. ही घटना आर्टिरियल एलबीएस रोडवर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव छक्कन अली असं असल्याचं समोर आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत मृत व्यक्तीवर एका व्यक्तीनं हल्ला केल्याचं समोर आलं आहे. गुन्हे शाखेचं पथक आता या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलीस तपासात हत्येतील आरोपी सैफ जाहिद अली असं असल्याचं आढळून आलं आहे. तो कारखान्याच्या त्याच युनिटमध्ये हेल्पर म्हणून काम करत होता.
क्षुल्लक कारणावरुन घडलेल्या घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपी सैल अलीला संध्याकाळी कल्याण रेल्वे स्थानकावर पकडलं. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, ऑटोरिक्षाचं भाडं देण्यावरून दोघांमध्ये भांडण झालं, त्यानंतर त्यानं हल्ला केला, परिणामी छक्कन अलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला पुढील कारवाईसाठी कुर्ला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. खुनाच्या आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
चार दिवसांपूर्वी नवी मुंबईतही झालेली हत्या
साधारणतः चार दिवसांपूर्वी नवी मुंबईत तलावाच्या काठी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानं मोठी खळबळ उडाली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही महिला तिच्या मित्रासोबत शेवटची दिसली होती. महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर तिच्या मित्रावर खुनाचा संशय होता. भाविका मोरे असं मृत महिलेचं नाव आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
यशश्री शिंदेचा गहाळ मोबाईल सापडला; गुंता सुटणार की आणखी वाढणार? खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता