Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढल्यानंतर भारताकडून कठोर भूमिका घेतली. देशातील विविध शहरांना हायअलर्टवर ठेवण्यात आल्यानंतर, मुंबई क्राईम ब्रँचला धक्कादायक माहिती मिळालीय. पैशांच्या बदल्यात कोणतीही वैध कागदपत्र न देता सिम कार्ड उपलब्ध करून देणाऱ्या टोळीचा मुंबई क्राईमब्रांचने पर्दाफाश केलाय. (Mumbai Crime) पहलगाम हल्ल्यानंतर तपास करताना मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे.
सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांच्या डोळ्यांची स्कॅनिंग, अंगठ्याचे ठसे घेत बेकायदेशीर सिमकार्ड विकण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी समीर महबूब खान (वय 23) याला अटक केलीय. त्याच्याकडून 75 सिम कार्ड्स आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर BNS कलम 336(2), 336(3), 340(2), 319(2), 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.मुंबई क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, एका टोळीची माहिती मिळाली जी मोठ्या पैशांच्या बदल्यात कोणतेही वैध कागदपत्र न देता सिम कार्ड उपलब्ध करून देत होती.
ग्राहकांच्या डोळ्यांची स्कॅनिंग, अंगठ्याचे ठसे घेत बनावट सिमकार्डची विक्री
क्राईम ब्रँच युनिट 6 चे पोलीस निरीक्षक सुशांत सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती Vi, Airtel आणि Jio या टेलिकॉम कंपन्यांचे अधिकृत वितरक असल्याचे भासवत आहे आणि ग्राहकांची डोळ्यांची स्कॅनिंग व अंगठ्याचे ठसे वारंवार घेऊन बेकायदेशीर सिम कार्ड्स देत असल्याचे समोर आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी योग्य KYC प्रक्रिया पूर्ण न करता सिम कार्ड्स जास्त दराने विकत होता.ही माहिती मिळाल्यानंतर क्राईम ब्रँचने एक बनावट ग्राहक पाठवत सापळा रचला. आरोपीने त्या बनावट ग्राहकाकडून कोणतेही वैध कागदपत्र न घेता अधिक पैसे घेऊन सिम कार्ड विकले. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत समीरला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून सिम कार्ड्स व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली.
पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई हायअलर्टवर असताना मुंबई क्राईम ब्रांचने केलेली ही मोठी कारवाई समजली जात आहे.जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत ₹58200 आहे. ही कारवाई बैंगणवाडी, शिवाजीनगर, गोवंडी येथे करण्यात आली आणि 20मे रोजी एफआयआर नोंदवण्यात आला.आरोपी अनेक ग्राहकांच्या बायोमेट्रिक डेटाचा विशेषतः त्यांच्या डोळ्यांचे स्कॅन आणि फिंगरप्रिंट्सचा गैरवापर करून सिम कार्ड बेकायदेशीरपणे सक्रिय करत असल्याचे समजले. त्यानंतर त्याने वैयक्तिक फायद्यासाठी योग्य केवायसीशिवाय ही सिम कार्डे महागड्या किमतीत विकली.
हेही वाचा: