Mumbai Crime News : मुंबई क्राईम गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी घाटकोपर युनिटने 1.22 कोटी रुपये किमतीच्या 610 ग्रॅम मेफेड्रोनसह तिघांना अटक केली आहे. यात एका विदेशी महिलेचा देखील समावेश आहे. हे अंमली पदार्थ 31 डिसेंबर रोजी मुंबई शहरात आयोजित विविध पार्टी पुरवला जाणार होता. ANC अधिकार्‍यांनी माहितीच्या आधारे प्रथम दोन स्थानिक ड्रग पेडलरला अटक केल्यानंतर त्यांच्याकडे 150 ग्रॅम मेफेड्रोन सापडले. तपासात त्यांनी हे मेफेड्रोन एका अफ्रिकन वंशाच्या महिलेकडून विरार पूर्व येथून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. 


त्यानंतर पोलिस पथकाने नायजेरियन महिलेला अटक केली. तिच्याकडे 460 ग्रॅम मेफेड्रोन सापडले आहे. असे एकूण 610 ग्राम मेफेड्रोने जप्त करून तिघांना अटक केले. यात आणखी किती जणांचा समावेश आहे याचा तपास पोलिस करत आहेत. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 6 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.   


एका दिवसात दोन मोठ्या कारवाया
नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त मुंबई पोलिसांची खबरदारी म्हणून काल आणि आज मुंबईत सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. याच्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी काल अनेक कारवाया केल्या आहेत. त्यातील आज  एकाच दिवसात दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. गुन्हे शाखा पोलिसांनी आज सकाळीच खारघर येथून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये 16 नायजेरियन व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून 83 लाख रूपयांचे हेरॉईन आणि 29 लाख रूपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 


आज सकाळच्या कारवाईत खारघर येथील एका रो हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांनी गुन्हे शाखेचे एकत्रित पथक तयार केले होते. या पथकाने शुक्रवारी खारघर सेक्टर 12 येथील सी 49 या रो हाऊसवर छापा टाकला. त्यावेळी रो हाऊसच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर जमलेल्या नायजेरियन व्यक्तींनी पोलिसांना धक्काबुकी करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी 17 जणांना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या  16 नायजेरियन संशयितांमधील सहा महिला आहेत.  


महत्वाच्या बातम्या


मुंबई आयआयटीतील मुलीचा पोलिसाकडून विनयभंग, नवी मुंबईतील पाम बीचवरील धक्कादायक घटना