Mumbai Crime News : दादरमधून (Dadar News) एक संतापजनक बातमी समोर येत आहे. पीटीच्या शिक्षकाने (Teacher) विद्यार्थिनीचा शाळेतच (Student) विनयभंग केल्याची घटना घडली आहे.  या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात (Bhoiwada Police Station) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. गौरव चौहान असे शिक्षकाचे नाव आहे.  


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दादरच्या पूर्व परिसरात असलेल्या एका शाळेत 12 वर्षीय मुलगी शिकत आहे. 27 डिसेंबर रोजी मुलगी शाळेत रेसलिंगच्या सरावासाठी आली होती. मुलगी शाळेच्या वर्गात एकटीच असल्याचे पाहून शिक्षक गौरव चौहान हा वर्गात शिरला. वर्गाबाहेर डोकावून बाहेर कोणी नसल्याची खात्री करून गौरवने वर्गाचा दरवाजा बंद केला. 


मुलीने पालकांना सांगितली आपबिती


त्यानंतर गौरवने मुलीच्या इच्छेविरोधात तिच्याशी गैरवर्तन केले. शाळेतील पीटी शिक्षकाच्या या वर्तनानंतर मुलगी मानसिक तणावात होती. पालकांनी याबाबत तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने सर्व हकीकत सांगितली. यानंतर पालकांनी तत्काळ  भोईवाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गौरव चौहान या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 


पोटच्या अल्पवयीन मुलीशीच वडिलांकडून गैरवर्तन


दरम्यान, शुक्रवारी वडाळा येथे पोटच्या अल्पवयीन मुलीशीच वडिलांनी गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीनेच वडिलांविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. वडाळ्यात पोटच्या अल्पवयीन मुलीशीच वडिलांकडून गैरवर्तन केल्याचा जात होते. 16 वर्षीय मुलगी झोपेत असताना वडिलांकडूनच मुलीला चुकीचा स्पर्श केला जात होता. मुलीने याबाबत कोणाला सांगितल्यास तिला नग्न घराबाहेर काढण्याची धमकी आरोपी वडिलांकडून दिली जात होती. मुलीने चर्चेमध्ये आपबिती सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणातील दोन फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; पुण्यातून सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात


Crime News: नारायण राणेंच्या नावाचा वापर करुन 45 लाखांची फसवणूक; मुंबईतील धक्कादायक घटना, नेमकं प्रकरण काय?