Astrology Panchang Yog 04 January 2025 : आज 04 जानेवारी शनिवारचा दिवस आहे. आज पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी तिथी आहे. त्यामुळे आज सिद्धी योग (Yog) निर्माण झाला आहे. त्याचबरोबर रवि योग आणि शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कर्तुत्वाने इतरांचं मन जिंकून घ्याल. तसेच, तुमचं आरोग्य आज चांगलं असेल. जर तुम्हाला एखादी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाल गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. जे लोक व्यावसायिक आहेत त्यांनी आपल्या कामावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज मित्रांबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. आज भविष्यासाठी तुम्ही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कराल. यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, धार्मिक कार्यातही तुमची रुची वाढेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या दिवसाची सुरुवात शुभ होईल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता. लवकरच तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. आज दिवसभरात तुम्ही एखादी चांगली गोष्ट शिकाल ज्याचा तुम्हाला भविष्यात चांगला फायदा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आरोग्य देखील एकदम ठणठणीत असेल. संध्याकाळच्या वेळी देवाचा नामस्मरण करा. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच, आज तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू सापडू शकते. ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाऊ शकते. ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:         


Horoscope Today 04 January 2025 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य