Mumbai Crime News : मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) मोठी कारवाई केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 10 ने एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्या ताब्यातून 80 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. सौजन्या भूषण पाटील ( वय 31  ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


बनावट नोटा घेऊन एक जण येणार असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली. माहिती मिळताच मुंबईतील पवई येथील आंबेडकर गार्डन जवळ, साकीविहार रोड येथे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. यावेळी एक व्यक्ती दुचाकीवरून  ( क्रमांक MH-48-AZ-1576 ) लाल रंगाच्या बॅगसह पवई येथे संशयीतरित्या उभा असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ असलेली बॅग चेक केली. यावेळी बॅगेत 500 रूपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा असल्याचे निर्दशनास आले. यावेळी पोलिसांनी अधिक तपासणी केली असता  500 रूपयांच्या नोटांचे  160 बंडल  आढळून आले. या प्रत्येक बंडल मध्ये 500 रूपयांच्या 100 नोटा अशा एकूण 16,000 नोटा आढळून आल्या, अशी माहिती प्रभरी पोलिस निरीक्षक दीपक सावंत यांनी दिली.   


भूषण पाटील या संशयित आरोपीविरोधात बनावट नोटा बाळगणे, त्या चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्याला 4 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस कसून तपास करत आहेत. या पूर्वी त्याने बनावट नोटा कोठे-कोठे खपवल्या आहेत, शिवाय त्याच्यासोबत यात आणखी कोण-कोण सहभागी आहे, याची पोलिस चौकशी करत आहेत. 


Mumbai Crime News : महिन्यात दुसरी कारवाई 


दरम्यान, मागच्याच महिन्यात पोलिसांनी एका टोळीचा पर्दापाश केला होता. जास्त पैसे देण्याच्या आमिषाने बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या एका टोळीला माटुंगा पोलिसांनी अटक केली होती. डबल पेसे देण्याच्या आमिषाने या टोळीने मुंबईत अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.  


महत्वाच्या बातम्या


मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रेल्वेचं खास गिफ्ट, विशेष गाड्या धावणार  


MLA Nitin Deshmukh : "तू आतमध्ये ये, तुला गेटवरच अटक करतो," पोलिसांनी नितीन देशमुख यांना धमकी दिल्याचा भास्कर जाधव यांचा दावा