Palghar Crime News : अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून अत्याचार सुरु असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पालघरमधून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गतीमंद मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक घटना पालघरच्या मनोर पोलीस ठाणे हद्दीत समोर आली आहे. 


अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून अत्याचार


14 वर्षाची गतीमंद अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनोर पोलीस ठाणे हद्दीतील आकेगव्हाण या परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. दिलेल्या फिर्यादीनंतर मनोर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात 376 आणि पोक्सोसह इतर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी गतिमंद असल्याने आरोपींच हे कृत्य समोर आलं नव्हतं. मात्र, मुलगी गरोदर असल्याची बाब समोर येताच, यामागचं हे सत्य उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे.


गतिमंद मुलगी सहा महिन्यांची गरोदर


अल्पवयीन मुलगी गतीमंद असल्याचा फायदा घेऊन दोन्ही आरोपी पीडितेवर मागील अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते, मात्र ही अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी एका आरोपीला शिताफिने जेरबंद केलं आहे.


एक आरोपी अटकेट, दुसरा फरार


एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दुसरा आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांकडून सध्या दुसऱ्या आरोपीचा शोध  सुरू आहे. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर परिसरातून संताप व्यक्त होतोय.म


महत्वाच्या इतर बातम्या :


Nalasopara News : हा कसला मुजोरपणा... झाड का तोडले? जाब विचारल्याने 70 वर्षीय वृद्धाला मारहाण; नालासोपारामधील घटना