Karnataka Man Killed Fiance : लग्न मोडल्याने नाराज तरुणाने अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाचं लग्न अल्पवयीन मुलीसोबत ठरलं होतं. या दोघांचा साखरपुडा झाला होता. पण, लग्न टळल्याने नाराज नवरदेवाने रागाच्या भरात तरुणाने अल्पवयीन मुलीची गळा चिरून हत्या केली. एवढंच नाही, तर मुलीचा गळा चिरल्यानंतर तो तिचं शिर घेऊन पळून गेला आणि नंतर ते मुंडकं झाडावर लटकवलं. कर्नाटकच्या मादीकेरी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर तरुणीच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आरोपी आणखी एकाच्या हत्येच्या तयारीत होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


लग्न टळल्याने नाराज तरुणाचं टोकाचं पाऊल


प्रकाश उर्फ ओमकारप्पा या तरुणाचं अल्पवयीन मुलीसोबत लग्न ठरलं होतं. या दोघांचा साखरपुडा पार पडला. मात्र, अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीचं लग्न होणार असल्याची माहिती बाल कल्याण अधिकाऱ्यांना दिली. यानंतर बाल कल्याण अधिकारी मुलीच्या घरी पोहोचले आणि त्यांनी मुलगी वयात येईपर्यंत दोन वर्षे लग्न टाळण्यास सांगितलं. अल्पवयीन मुलीचं लग्न लावल्यास त्यांच्यावर पोक्सो आणि बालविवाह कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीदही अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर दोन्ही कुटुंबियांनी लग्न स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर नाराज तरुण प्रकाश याने टोकाचं पाऊल उचललं.


अल्पवयीन मुलीची गळा चिरून हत्या 


लग्न टळल्याने नाराज प्रकाशने मुलीला संपवण्याचा निर्धार केला. तो रागाच्या भरात तिच्या घरात गेला आणि त्याने तिचं गळा कापला, धड वेगळं केल आणि कापलेलं मुंडकं घेऊन पळाला. काही वेळ तो घराजवळच्याच झुडुपांमध्ये लपला होता. त्यानंतर तो तिथून पळून गेला. यानंतर आरोपीने मुलीचं मुंडकं घटनास्थळापासून 300 मीटर दूर असलेल्या झाडावर लटकवलं. यानंतर तो पुन्हा जंगलात लपला आणि परिसरात सामसूम झाल्यावर तेथून पळून गेला. या धावपळीत तो खून केलेला चाकू मात्र झुडुपांतच विसरला.


गळा चिरुन मुंडकं झाडावर लटकवलं 


घरी मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी कसून आरोपीचा तपास सुरु केला. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध सुरु केला. यानंतर पोलिसांनी आरोपी प्रकाशला कुम्बारागाडिगे येथी परिसरातून अटक केली. आरोपी प्रकाशसोबत पोलिसांनी चाकू, मुलीचं कापलेलं शिर ताब्यात घेतलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


गर्लफ्रेंडचं दुसऱ्यावर जडलं प्रेम, बॉयफ्रेंडच्या डोक्यात गेली सनक; एकामागोमाग एक 6 चाकूने 17 वेळा वार करत संपवलं