Brutal Murder Case : सध्या हत्येच्या अशा निर्घृण घटना ऐकायला मिळतात की, ते ऐकन पायाखालची जमीनच सरकून जाते. असंच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. गर्लफ्रेंडचं दुसऱ्याच व्यक्तींवर प्रेम जडलं. या रागातून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. इतकंच नाही तर आरोपी प्रियकराने प्रेयसीवर सहा वेगवेगळ्या चाकूने 17 वेळा वार केले. प्रसिद्ध मॉडेल मोनिक लेजास्कच्या हत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मोनिक लेजास्कची तिचा बॉयफ्रेंड स्वेन लिंडमेन याने हत्या केली. मॉडेल मोनिक लेजास्कला एक दहा वर्षाची मुलगीही आहे. मोनिकच्या हत्येनंतर ती आता अनाथ झाली आहे.


बॉयफ्रेंडकडून गर्लफ्रेंडवर 17 वेळा चाकूने वार


मोनिक लेजास्कला कधी स्वप्नातही वाटलं नसेल की, तिचा प्रियकर ज्याच्यासोबत तिने कधी-काळी संपूर्ण आयुष्य सोबत घालवण्याचा विचार केला होता, तोच प्रियकर तिचा काळ ठरेल. मेलबर्नमधील प्रसिद्ध मॉडेल मोनिक लेजास्क आणि तिचा बॉयफ्रेंड स्वेन लिंडमेन हे लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होते. मोनिकला दहा वर्षांची मुलगीही आहे. आई आणि मुलगी दोघीही फिटनेसवर खूप लक्ष देतात. मोनिकची स्वेनसोबतची ओळख जीममध्ये झाली. यानंतर दोघांची मैत्री प्रेमात रुपांतरीत झाली आणि ते दोघे सोबत राहू लागले. पण एक दिवस असा आला की, रागाच्या भरात स्वेनने चाकूने जीवघेणा हल्ला करत मोनिकची हत्या केली.


हत्येमागचं नेमकं कारण काय?


दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. स्वेन आणि मोनिक गेल्या पाच वर्षांपासून एकत्र राहत होते. दोघेही एका जिममध्ये भेटले होते. इथून दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यानंतर दोघेही एकत्र राहू लागले, पण काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद झाले. छोट्या-छोट्या गोष्टींवरून दोघांमध्ये खटके उडू लागले. दोघांच्या भांडणाचा परिणाम मोनिकच्या मुलीवरही होत होता. यामुळेच मोनिकच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली. यानंतर, मोनिक स्वेनसोबत कमी आणि तिसऱ्या व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवू लागली. यानंतर मोनिकने स्वेनला स्पष्ट शब्दात सांगितलं की, ती दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे आणि आता तिला आता नवीन साथीदारासोबत राहायचं आहे.


गर्लफ्रेंडचं दुसऱ्यावर जडलं प्रेम


मोनिकचं दुसऱ्यावर प्रेम जडलं असून ती आपल्याला तिच्या आयुष्यातून बाजूला करत असल्याचं पाहून स्वेनचा राग अनावर झाला. तू माझ्याशी असं करू शकत नाहीस, असं स्वेनने मोनिकला म्हटलं. यानंतर मोनिकने तिला तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला आणि ती तिच्या खोलीत गेली. या भांडणाची माहिती तिने जवळच्या व्यक्तींना सांगितली. स्वेन रागाच्या भरात काही चुकीचे पाऊल उचलेल, अशी भीती तिला वाटत होती. अखेर मोनिकची ही भीती खरी ठरली.


मोनिक जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात सापडली 


सकाळ झाली आणि स्वेन मोनिकच्या खोलीत गेला. साडेसातच्या सुमारास त्याने मोनिकवर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. मोनिकचा आरडाओरडा ऐकून तिची मुलगी तिथे पोहोचली आणि आरडाओरडाही करू लागली. चिमुकलीला तिची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिने तात्काळ पोलिसांना फोन केला. या दरम्यान मुलीनेच स्वेनकडून चाकू हिसकावून घेतला यामध्ये मुलगीही जखमी झाली. 


सहा चाकूने 17 वेळा वार


स्वेनच्या डोक्यात भयंकर राग गेला होता. त्या रागाच्या भरात तो मोनिकवर हल्ला करत राहील. तो सतत मोनिकवर चाकूने वार करत होता. एक चाकू तुटला, तरी त्याने तिला मारणे थांबवलं नाही. दुसरा चाकूही तुटला. स्वेनने मोनिकवर जीवघेणा हल्ला करताना 6 चाकू तोडले, पण हल्ला करणं मात्र थांबवलं नाही. मोनिक अखेरचा श्वास घेईपर्यंत स्वेनने हल्ला करणं सुरूच ठेवलं.  स्वेनने मोनिकवर चाकूने 17 वार केले.