बीड :  शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पुतण्याने गळफास घेऊन त्यांच्या राहत्या गावी आत्महत्या केली आहे. सचिन मेटे (Sachin Mete) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो 34 वर्षाचा होता. विनायक मेटे यांचे बंधू त्रिंबक मेटे यांचा तो मुलगा असून त्याने आत्महत्या नेमकी कुठल्या कारणाने केली याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मेटे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 


शिवसंग्राम या मराठा संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे मागील वर्षी 14 ऑगस्ट 2022 रोजी अपघातात निधन झाले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा पहिला स्मृतीदिन झाला होता. त्यानंतर आता वर्षभरातच मेटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 


विनायक मेटे यांचा पुतण्या सचिन मेटे याने अचानकपणे टोकाचे पाऊल का उचचले? याचा तपास पोलीस करत आहेत. आत्महत्या करण्यामागे काही कारणे आहेत की अन्य कारणे याची चौकशीदेखील पोलिसांकडून करण्यात येणार आहे. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.