सोलापूर : भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या मनोहर मामा भोसले (Manohar Bhosale) आणि त्याच्या सहकाऱ्यांना माढा न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने मनोहर भोसलेला पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. विशाल वाघमारे आणि नरेंद्र सांगळे असं भोसलेच्या सहकाऱ्यांची नावे आहेत. दरम्यान, करमाळा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्यातील प्रकरणात करमाळा पोलीस माढा न्यायालयाच्या परवानगीने मनोहर भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

आजच्या कामकाजात सरकारी पक्षाकडून मनोहर भोसले आणि त्याचा दोन साथीदारांच्या विरोधात संघटित गुन्हेगारीचे कलम वाढवण्यात आले आहे. त्यामुळे मनोहर भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांना जामिनासाठी आता बार्शी सत्र न्यायालयात जावे लागण्याची शक्यता आहे. 

Manohar Bhosale Ashram Controversy : 27 एकरातील आलिशान आश्रम चर्चेत

मनोहर भोसलेचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील घोटी येथे 27 एकरात पसरलेला आलिशान आश्रम असल्याची माहिती समोर आली आहे. येथे दर अमावस्येला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असे. बाबाला भेटण्यासाठी 11 हजार रुपयांची फी घेतली जात असल्याचंही समोर आलं आहे.

Continues below advertisement

या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून अशा भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Who Is Manohar Mama Bhosale : कोण आहे मनोहर मामा भोसले? 

  • इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातला मूळचा रहिवासी.
  • डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता.
  • एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला. 
  • करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्याने स्वतःचा मठ थाटला होता.
  • साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली.
  • अनेक मोठ्या नेत्यासोबत देखील मनोहर मामा याचे फोटो आहेत. 
  • अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करायचे अशी चर्चा आहे.
  • या आधी त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणात सोलापुरातील करमाळा पोलिसात गुन्हा दाखल आहे. 
  • कर्करोग बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत तर मणक्याचे आजार बरे करतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा नोंद आहे. 
  • 2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्याने आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली होती. 

ही बातमी वाचा: