Malegaon Blast Case Verdict: 29 सप्टेंबर 2008 साली मालेगाव शहर हादरवणाऱ्या भीषण बॉम्बस्फोटाला (Malegaon Blast Case Verdict) आज जवळपास 17 वर्षं पूर्ण होत आहेत. भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती. आता, तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात आज ( दि.31) लागणार आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
मालेगाव स्फोटप्रकरणी आतापर्यंत काय काय घडलं?
- २९ सप्टेंबर २००८ साली रमजान महिन्यात झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू तर शंभरहून अधिक जखमी
- मशिदी जवळ ठेवण्यात आलेल्या दुचाकीचा झाला होता स्फोट
- भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित तसेच मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर आहेत आरोप
- १९ एप्रिल ला सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने ठेवला होता निर्णय राखून
- आरोपींना योग्य ती शिक्षा देण्याची एनआयएची मागणी
- मालेगावात स्फोट घडवून मुस्लिम समाजात भीतीचं वातावरण पसरवून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याच कारस्थान असल्याचं एनआयए आहे
- संपूर्ण गटात आरोपींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा पुराव्यानिशी स्पष्ट होत असल्याचं एनआयए म्हणणं आहे
- मालेगाव स्फोटांचा सुरुवातीचा तपास हा दहशतवाद विरोधी पथक एटीएस ने केला होता तर 2011 साली तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हस्तांतरित करण्यात आला
- सात आरोपींवर आरोप निश्चिती केल्यानंतर 2018 मध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली
- आरोपींवर युएपीए कायद्याच्या दहशतवादी कृत्य करणे आणि दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचणे तसेच भारतीय दंड संहितेच्या हत्या, हत्येचा प्रयत्न तसेच धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे
- सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने 323 साक्षीदार तपासले असून त्यातील 37 साक्षीदार फितूर झाले
- ज्या दुचाकीत स्फोटक ठेवण्यात आली होती ती साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची असल्याचा एटीएसचा दावा होता
- २३ ऑक्टोबर २००८ मध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर अटक करण्यात आली
- त्यानंतर सुरू झालेल्या अटक सत्रात १४ नोव्हेंबर पर्यंत एकूण ११ जणांना अटक करण्यात आली
- एटीएसने या प्रकरणी मोक्का लावला होता मात्र नंतर मोक्का मागे घेण्यात आला
- जानेवारी २००८ मध्ये कट रचण्यात आला असून आरोपींनी फरीदाबाद भोपाळ नाशिक येथे मीटिंग केलाच एटीएसचा दावा होता
- स्फोटांमध्येव RDX चा वापर करण्यात आला होता
- जम्मू आणि काश्मीर मधील पोस्टिंग दरम्यान आरडीएक्स मिळवल्याचा आणि त्यानंतर सुधाकर चतुर्वेदीच्या घरी बॉम्ब बनवण्यात आल्याचा एटीएसचा आरोप
- चतुर्वेदी आणि रामचंद्र कालासंग्रा यांनी बॉम्ब दुचाकीवर बसून त्यानंतर ती दुचाकी गजबजलेल्या ठिकाणी पार करण्यात आले
- रामचंद्र कलासंग्रा आणि संदीप डांगे अद्याप फरार
- प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या नावावर असलेली मोटरसायकल कलासांग्राच्या ताब्यात होती: NIA
- मला हा प्रकरणात गोवण्यात आल्याचा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा दावा आहे आपल्या विरोधात पुरावे नसल्याचा कर्नल प्रसाद पुरोहित यांचा दावा आहे
- मोक्का हटवल्यानंतर मोक्का अंतर्गत घेतलेले जबाबांची किंमत जवळ जवळ शून्य
- एटीएसच्या तपासात दोष असल्याचा दावा करत एनआयएने नव्याने काही जबाब नोंदवले होते त्यावेळी देखील काही साक्षीदारांनी आपली साक्ष बदलली
- प्रथमदर्शनी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर विरोधात पुरावे नसल्याचे सांगत तिला आरोपींची यादीतून वगळण्याची होती NNIA ची मागणी
- मात्र पुरेसे पुरावे असल्याचे स्पष्ट करत येण्याची मागणी विशेष एनआयए कोर्टाने फेटाळली होती
आरोपींची नावे-
1. प्रसाद पुरोहित 2. साध्वी प्रज्ञासिंह3. समीर कुलकर्णी4. रमेश उपाध्याय5. अजय राहिरकर6. सुधाकर द्विवेदी7. सुधाकर चतुर्वेदी8. रामजी कालसंग्रा – फरार9. शामजी साहू – फरार10. संदीप डांगे – फरार11. प्रविण तकलकी – फरार12. राकेश धावडे - फरार