बीड : जेलमध्ये चोरून कोणी दारू सिगारेट नेल्याची अनेक बातम्या आपण ऐकल्या आहेत. मात्र चक्क जेलमध्ये राहून एक कैदी लाखो रुपयांची हेराफेरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटना जरी उज्जैन जेलमध्ये असली तरी हा कैदी मात्र बीडचा आहे.
अमर अग्रवाल असे उज्जैन कैद्याचे नाव आहे. सायबर गुन्ह्यात तुरुंगात असणाऱ्या या अमरने तुरुंगात राहून वेबसाईट हॅक करून लाखो रुपयांची हेराफेरी केली आहे. विशेष म्हणजे स्वतः जेलर आणि पोलिस यांनी अमरकडून हे काम करून घेतले आहे. स्वतः अमर अग्रवालने याचा एक व्हिडीओ करून तो व्हायरल केला. व्हायरल व्हिडीओमुळे जेलमध्ये चालू असलेल्या या खळबळजनक प्रकरण समोर आले आहे.
अमर अग्रवालचा प्रवास मोठा रंजक आहे. सायबर क्राईममध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत तो हा अमर अग्रवाल नसून त्याचे नाव कृष्णा केसकर आहे. बीड जवळच्या हिवरा पहाडीच्या या ठगाने केवळ महाराष्ट्रात आणि देशातच नाही तर देशाबाहेरील लोकांना देखील ऑनलाइन गंडा घातलाय.
कृष्णा केसकरचा अमर अग्रवाल बनण्याचा प्रवास हा एका फ्रॉड लग्नापासून सुरू झाला. त्याने 2017 मध्ये ऑनलाइन मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून एका आयटी प्रोफेशनल तरुणीशी ओळख करत आपण अमर अग्रवाल असून कॅलिफोर्नियात एका कंपनीचे सीईओ असल्याचे सांगत लग्न करण्यासाठी यूएसएला येण्यास सांगितले. व्हिजा आणि तिकिटांसाठी चार लाख रुपये उकळून तिची फसवणूक केली. या प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती.
मागच्या तीन वर्षापासून कृष्णा केसकरला त्याचे कुटुंबीय भेटू शकले नाहीत. हिवरा पहाडीला एका पत्र्याच्या शेडमध्ये त्याचा कुटुंब हात तीन भावंडांमध्ये कृष्णा हा सर्वात जास्त शिकलेला मात्र केवळ झटपट पैसे कमावण्याचा नादामध्ये कृष्णा आज केवळ राज्यातच नाही तर देशांमधला सायबर क्राईमच्या टॉप मोस्ट गुन्हेगार ठरला आहे.
संबंधित बातम्या :