सातारा : थंडगार हवेचे ठिकाण म्हणून प्रचलित असणाऱ्या महाबळेश्वरातील एक धक्कादाय प्रकार जागतिक महिलादिना दिवशीच उघडकिस आला. शाळेच्या शिक्षकानेच विद्यार्थीनीवर बलत्कार केलाय. हा सर्व प्रकार चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 वर केलेल्या तक्रारीमुळे उघडकीस आला. या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलिसांनी नराधम शिक्षक दिपक ढेबे याला बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायालयाने आता सात दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. शिक्षकाच्या या कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध होत असून येथील महिलांनी अश्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत आहे. तर महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने शाळेवर आंदोलन करत संबधित शिक्षकाची हाकलपट्टी करावी अशी मागणीही केली.


दिलीप ढेबे हे महाबळेश्वरातील प्रचलित हायस्कुलचे प्राचार्य आहेत. याच हायस्कुलमधील शाळकरी विद्यार्थींनीवर शाळेच्या प्रयोग शाळेत बलत्कार केल्याचे उघड झाले आहे. या बाबतची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 वर फोन करून दिल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी या हेल्पलाईन वरून आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत याबाबतची माहिती महाबळेश्वर पोलिसांना दिली. पीडित विद्यार्थीनीचा पत्ता महाबळेश्वर पोलिसांनी शोधुन काढत संबधित मुलीकडे विचारना केली असता तीने शिक्षकाचे कृत्य पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने नराधम शिक्षक दिपक ढेबे याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे. आरोपी दिलीप ढेबे याच्यावर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात भादंवि 354 अ, 376 क, बालकांचे लैगिंक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 5ओ, 5 पी , 6, 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षकाला आज विशेष न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


शिक्षकाची हकालपट्टी करण्याची मनसेची मागणी
दरम्यान घडलेल्या प्रकाराची माहिती महाराष्ट्र नव निर्मान सेनेच्या कार्यकर्त्यांना समजताच मनसेच्या ओमकार नाविलकर, ओमकार पवार, अशोक शिंदे, राजेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांसमवेत शाळेत जाऊन संबधित शिक्षकाला लवकरात लवकर निलंबीत करावे अशी मागणी केली. जर शिक्षकाला निलंबीत केले नाही तर याचे परिणाम शाळेला भोगावे लागेल आणि मनसे स्टाईलने आम्हाला आंदोलन करावे लागेल असा ईशाराही दिला. तर पोलिस कोठडीत असलेल्या शिक्षकाने या आगोदरही असे काही कृत्य केले आहे का? याची पोलिसांनी कसून चौकशी करावी अशी मागणीही मनसेने केली आहे.


सरकारला बाल हक्क संरक्षण आयोगाला अध्यक्ष देण्याची बुद्धी का होत नाहीये? : चित्रा वाघ 


महाबळेश्वरला अल्पवयीन मुलीवर तिच्या शिक्षकानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. याची माहिती चाइल्ड हेल्पलाईनला माहिती मिळताच सातारा पोलिसांनी कारवाई करत नराधमाच्या मुसक्या आवळल्या याबद्दल सातारा पोलिसांचे अभिनंदन. याने अजून मुलींवर असा अत्याचार केला असल्याची शक्यता नाकारतां येत नाही त्यामुळे कसून चौकशी करा, अशी मागणी करत अल्पवयीन मुलांवरचे वाढते अत्याचार पाहूनही सरकारला बाल हक्क संरक्षण आयोगाला अध्यक्ष देण्याची बुद्धी का होत नाहीये? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला. काही महिन्यांची 11 बालकं होरपळून मेली तर महाबळेश्वर सारख्या घटना कुठं ना कुठं घडतातचं आहे. राज्यातल्या जनतेने उघड्या डोळ्यांनी अजून किती घटना पहायच्या आहेत? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित करत महाविकास आघाडीवर टीका केली.