चिपळूण :  काही दिवसांवरच शिमगोत्सव येऊन ठेपला असून त्याची धामधूम आत्तापासूनच सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर विविध देवस्थानच्या बैठका सुरु झाले आहेत. शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात बैठक सुरू असताना पालखीच्या वाटेवरून वाद झाला आणि त्यातून एकाच्या पोटात चाकू खुपसल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उशीरा घडला.  याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गेली दोन वर्ष कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वत्र शिमगोत्सवावर निर्बंध होते. त्यामुळे अनेक ठिकाणी साध्या पद्धतीने तर काही ठिकाणी उत्सव साधना करतात मंदिरातच शिमगोत्सव साजरा करावा लागला होता. मात्र आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रण आले असल्याने सर्वत्र शिमगोत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी सजावट व विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. एवढेच नव्हे या उत्सवासाठी मुंबई, पुण्यातील चाकरमानी देखील कोकणच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय देवस्थानमार्फत शिमगोत्सवाची तयारी केली जात आहे.


शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात गावची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भोजने यांच्या दोन कुटुंबातील वाटेवरून सुरु असलेला वाद उफाळून आला. या वादाविषयी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मात्र शिमगोत्सवानिमित्त पालखीची वाट मोकळी करावी अशी मागणी एका कुटुंबाने केली. त्याचा राग येऊन एकाने चक्क त्याच्याच चुलत भावाच्या पोटात चाकूसारख्या धारदार हत्याराने वार केला. या प्रकारामुळे बैठकीला असलेले सर्व ग्रामस्थ भयभीत झाले होते. त्यामुळे या परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ला झालेली व्यक्ती गंभीरपणे जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


संबंधित बातम्या :


Kalyan Crime : तीन सख्ख्या भावांवर हल्ला, दोघांचा मृत्यू; आरोपीला 12 वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा