Solapur Crime News: सोलापुरातील स्वागत नगर परिसरात एका वृद्ध दाम्पत्याचा गळा दाबून खून (Solapur Crime News) करण्यात आला आहे. महादेव मंचाळ आणि रंगम्मा महादेव मंचाळ असे हत्या झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. महादेव मंचाळ हे बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झालेले होते. 

Continues below advertisement

नेमकं काय घडलं? (Solapur Crime News)

काही महिन्यापासून मंचाळ यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे ते शेजारी असलेल्या एका कच्च्या घरात राहत होते. काल दुपारच्या सुमारास बांधकाम करण्यासाठी आलेले मजूर पिण्याचे पाणी मागण्यासाठी गेले असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पंचनामा केला. 

दोघांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे समोर- (Solapur Crime News)

प्राथमिक अहवालानुसार दोघांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निदर्शनास आलं आहे. मात्र त्यांची हत्या कोणी आणि का केली? हे मात्र समजू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी अद्यात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.

Continues below advertisement

मुंबईतील एक धक्कादायक घटना- (Mumbai Crime News)

काळी जादू केल्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने व्हिडीओ कॉलवक मुलाला आईचा मृतदहे दाखवला. मुंबईतील धारावीमध्ये ही घटना घडली. मुलगा शिवराम सोलंकी (33) मुलुंडमधून आई-वडिलांच्या घरी आला. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने मुलाने वडिलांना फोन केला. अमृत सोलंकी यांनी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर मुलाला आईचा मृतदेह दाखवला. आरोपीने सांगितले की, त्याने पत्नीचा गळा दाबून हत्या केली आणि बाटलीनेही वार केला. पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस घटनास्थळी धावून गेले, दरवाजा तोडून सूरजबेन यांना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपी अमृत सोलंकी याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Mumbai Crime News: टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर