Latur News Update : लातूरमध्ये (Latur) एक धक्कादायक घटाना समोर आलीय. शेतीला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या वृद्धाची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आलीय. बशीर मदार शेख असे हत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे. लातूर जिल्ह्यातील बाभळगाव-बोरी रस्त्याच्या कडेला पाय, एक हात आणि शीर असे तुकडे आढळल्यानंतर ही घटना समोर आलीय. लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून असा प्रकारे निर्घृण खूनाची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


लातूर पासून जवळ असलेल्या बाभळगाव- बोरी रस्त्याच्या कडेला एका वृद्धाचे शीर, एक हात आणि पाय आढळून आले आहेत. मृत वृद्ध बाभळगाव येथील रहिवासी आहेत. बाभाळगावपासून दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला शेख यांच्या शेतातच शीर, एक हात आणि दोन पाय असे अवयव आढळून आले. त्यामुळे शेख यांची हत्या झाल्याचे समोर आले. परंतु, ही हत्या कोणी आणि का केली यायबाबत अद्याप माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 


अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल


रात्रीची लाईट असल्यामुळे रात्री नऊ वाजता बशीर शेख हे शेतात पाणी देत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी शेतात त्यांच्या जेवनाचा डबा घेऊन गेली. परंतु, शेख शेतात आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी परिसरात चौकशी केली. मात्र शेख कोठेच सापडले नाहीत. शेतात फक्त बुट आणि मोटारसायकल होती. न सांगता नातेवाईकांकडे गेले असतील असे समजून पत्नीने अधिक चौकशी केली नाही. मात्र आज त्यांचा हात कुत्रे घेऊन जात असताना शेजारील शेतकऱ्यांना दिसले. त्यानंतर शेतकऱ्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना  महिती दिली. माहिती मिळताच लातूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासला सुरुवात केली. बशीर शेख यांच्या पत्नी आणि मुलीच्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात भादवी कलम 302 व 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. 


दरम्यान, खुनाचा गुन्हा दाखल झाला असला तरी याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस तपासानंतरच अशा प्रकारे निर्घृण हत्या करण्यामागचे कारण समजेल. शिवाय ही हत्या कोणी केली याबाबत देखील माहिती मिळेल. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस कसून तपास करत आहेत. 


महत्वाच्या बातम्या


आमदारांना फोन लावू का? चकरा मारुन 11 महिन्यांनी गुन्हा दाखल, बीड पोलिसांसमोर वृद्ध दाम्पत्य हतबल