Kurla Phoenix Mall Mumbai News: कुर्ला येथील फिनिक्स मॉलजवळ (Kurla Phoenix Mall Couple News) असलेल्या पालिकेच्या उद्यानात एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओनंतर एकच खळबळ उडाली. एक तरुण आणि तरुणी उद्यानात फोटो काढत असताना आठ ते दहा अल्पवयीन मुलांनी त्यांची छेडछाड केली आणि या वादातून या तरुण तरुणीला बेदम मारहाण केली आहे. कालची (20 नोव्हेंबर) ही घटना असून या तरुण तरुणीच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडीओ काही स्थानिकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून समाज माध्यमात तो प्रचंड व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे. घाटकोपर पोलिसांनी तक्रार दाखल होताच आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. (Kurla Phoenix Mall Mumbai News)

Continues below advertisement

किरीट सोमय्यांनी सांगितलं धक्कादायक कारण- (Kirit Somaiya Kurla Crime News)

घाटकोपर येथील फिनिक्स मॉलजवळ मुस्लिम कट्टरवाद्यांकडून तरुण हिंदू मित्रांवर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १८९(४), ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत कायद्याशी संघर्षात आलेल्या 8 मुलांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तसेच, 5 मुलांच्या पालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, असं भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले. मुस्लीम कट्टरवाद्यांकडून तरुण हिंदू मुलीवर हल्ला करण्यात आल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितले. हमारे एरिया मै क्यू आए हैं...असं विचारत अल्पवयीन आरोपींकडून तरुण-तरुणीला मारहाण सुरु केली. मुलीची छेड काढली, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. 

कुर्ल्याच्या प्रमोद महाजन गार्डनमध्ये काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शी महिलेने काय काय म्हणाली? (Mumbai News)

काल चार साडेचारच्या दरम्यान काही मुलांचा गोंधळ इथे झाला. मुलाला काहीजण मारत होती. पैसे मागत होती. मी वरतून फक्त मारहाण होताना बघितलं. त्याच्यानंतर मुलाला मारहाण करत पलीकडे घेऊन गेली. मला नंतर काय झालं माहिती नाही. पण मोठा गोंधळ काळ झाला. इथे सुरक्षा रक्षक नसतात. गर्दुल्ले येतात पण आम्हाला त्रास देत नाहीत. नशाबाजी इथे होते कोणीही सुरक्षारक्षक नसतो, असं प्रमोद महाजन गार्डनमध्ये काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले.  

Continues below advertisement

कुर्ल्याच्या प्रमोद महाजन गार्डनमध्ये मुला-मुलीसोबत नेमकं काय घडलं? (Mumbai Kurla Phoenix Mall News)

  • ज्या मुला मुलीला मारहाण झाली ते कुर्ला फिनिक्स मॉलमध्ये आले होते. साधारणपणे दुपारी चारच्या दरम्यान फिनिक्स मॉल फिरायला आले होते. 
  • फिनिक्स मॉलमधून बाहेर आल्यानंतर ते फिनिक्स मॉलजवळ असलेल्या प्रमोद महाजन गार्डनमध्ये फोटो काढण्यासाठी गेले. 
  • महाजन गार्डनमध्ये फोटो काढत असताना सात आठ अल्पवयीन मुलांनी त्यांना मारायला सुरुवात केली. 
  • हातात असलेल्या काठीने सुरुवातीला मुलाला मारायला सुरुवात केली. त्यानंतर मुलाच्यासोबत असलेल्या मुलीलासुद्धा त्यांनी मारहाण केली. 
  • या मारहाणीमध्ये मुलगा मुलगी जखमी झाले आणि त्यांना जवळच्या राजावाडी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. 
  • घाटकोपर पोलीस यांनी तक्रार दाखल केल्यानंतर मारहाण केलेल्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये बोलण्यात आलं. 
  • ज्या मुला मुलीला मारहाण झाली ते या परिसरात राहत नाहीत. फिनिक्स मॉलमध्ये ते दोघे आले होते. मुलगी मुलगी मराठी मुलगा साताऱ्यामध्ये राहतो.
  • मुलगा मुलीला भेटण्यासाठी साताऱ्याहून मुंबईत आला होता आणि दोघेही मित्र मैत्रीण असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितले.
  • महाजन गार्डनमध्ये गार्डन तयार झाल्यापासून इथे आजूबाजूचे रहिवासी पार फिरायला येत नाहीत अनेक गर्दुल्ले इथे बसलेले असतात. या प्रकारच्या तक्रारी सुद्धा स्थानिकांनी केल्याचं म्हटलं आहे.
  • मारहाण झालेले मुलगा 21 वर्षाचा आणि मुलगी 19 वर्षाची आहे. तर मारणारे मुलं हे अल्पवयीन आहेत.

कुर्ल्याच्या प्रमोद महाजन गार्डनमध्ये मुला-मुलीसोबत नेमकं काय घडलं?, VIDEO:

संबंधित बातमी:

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ तरुण-तरुणीला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात

Kurla Phoenix Mall Mumbai News: साताऱ्याचा मुलगा, नवी मुंबईची मुलगी, मराठी तरुण-तरुणीला कुर्ल्यात मारहाण, मुंबई पोलिसांनो, हुल्लडबाजांची मस्ती उतरवा!