Kurla Phoenix Mall Mumbai News मुंबई: मुंबईतील कुर्ला परिसरात गुंडगिरीचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. फिनिक्स मॉलजवळील (Kurla Phoenix Mall) पालिकेच्या प्रमोद महाजन उद्यानात फोटो काढत असलेल्या तरुण-तरुणीला 8 ते 10 अल्पवयीन मुलांनी घेरत मारहाण केली आहे. आधी छेडछाड आणि त्यानंतर झालेल्या वादातून या टोळक्याने दोघांवरही हल्ला केल्याची माहिती आहे. काल घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय. भरदिवसा सार्वजनिक उद्यानात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पीडित तरुण-तरुणीच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. (Mumbai Kurla Crime News)

Continues below advertisement

कुर्ल्याच्या प्रमोद महाजन गार्डनमध्ये मुला-मुलीसोबत नेमकं काय घडलं? (Mumbai Kurla Phoenix Mall News)

  • ज्या मुला मुलीला मारहाण झाली ते कुर्ला फिनिक्स मॉलमध्ये आले होते. साधारणपणे दुपारी चारच्या दरम्यान फिनिक्स मॉल फिरायला आले होते. 
  • फिनिक्स मॉलमधून बाहेर आल्यानंतर ते फिनिक्स मॉलजवळ असलेल्या प्रमोद महाजन गार्डनमध्ये फोटो काढण्यासाठी गेले. 
  • महाजन गार्डनमध्ये फोटो काढत असताना सात आठ अल्पवयीन मुलांनी त्यांना मारायला सुरुवात केली. 
  • हातात असलेल्या काठीने सुरुवातीला मुलाला मारायला सुरुवात केली. त्यानंतर मुलाच्यासोबत असलेल्या मुलीलासुद्धा त्यांनी मारहाण केली. 
  • या मारहाणीमध्ये मुलगा मुलगी जखमी झाले आणि त्यांना जवळच्या राजावाडी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. 
  • घाटकोपर पोलीस यांनी तक्रार दाखल केल्यानंतर मारहाण केलेल्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये बोलण्यात आलं. 
  • ज्या मुला मुलीला मारहाण झाली ते या परिसरात राहत नाहीत. फिनिक्स मॉलमध्ये ते दोघे आले होते. मुलगी मुलगी मराठी मुलगा साताऱ्यामध्ये राहतो.
  • मुलगा मुलीला भेटण्यासाठी साताऱ्याहून मुंबईत आला होता आणि दोघेही मित्र मैत्रीण असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितले.
  • महाजन गार्डनमध्ये गार्डन तयार झाल्यापासून इथे आजूबाजूचे रहिवासी पार फिरायला येत नाहीत अनेक गर्दुल्ले इथे बसलेले असतात. या प्रकारच्या तक्रारी सुद्धा स्थानिकांनी केल्याचं म्हटलं आहे.
  • मारहाण झालेले मुलगा 21 वर्षाचा आणि मुलगी 19 वर्षाची आहे. तर मारणारे मुलं हे अल्पवयीन आहेत.

किरीट सोमय्या यांचे कुर्ल्यातील बेदम मारहाणीच्या घटनेवर ट्विट- (Kirit Somaiya On Kurla Phoenix Mall News)

घाटकोपर येथील फिनिक्स मॉलजवळ मुस्लिम कट्टरवाद्यांकडून तरुण हिंदू मित्रांवर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १८९(४), ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत कायद्याशी संघर्षात आलेल्या 8 मुलांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तसेच, 5 मुलांच्या पालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मी आज दुपारी 4 वाजता या परिसराला भेट देणार आहे, असं भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले. मुस्लीम कट्टरवाद्यांकडून तरुण हिंदू मुलीवर हल्ला करण्यात आल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं? (Mumbai Crime News)

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मॉल (फिनिक्स मार्केटसिटी) परिसरातील उद्यानाजवळ एका जोडप्याला सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुण-तरुणीला मारहाण करत असल्याचं व्हिडीओमधून दिसून येत आहे. दगड, कंबरेवरील बेल्ट, लाकडाचा वापर करुन संबंधित अल्पवयीन तरुणांनी मुलासह तरुणीलाही मारहाण केल्याचं समोर आलं आहे. मुलीच्या डोक्यातही लाकडाने फटका मारण्यात आला. तसेच तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे व्हिडीओमधून दिसून येत आहे. नेमकं काय घडलं, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु सदर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Continues below advertisement

कुर्ल्याच्या प्रमोद महाजन गार्डनमध्ये मुला-मुलीसोबत नेमकं काय घडलं?, VIDEO:

संबंधित बातमी:

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ तरुण-तरुणीला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात