Pune Crime : पुणे जिल्ह्यात (Pune Crime) सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या डोणजे गावामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर (Vitthav Polekar) यांचं अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.14) घडली होती. आपल्या गुन्हेगारीची दहशत निर्माण व्हावी यासाठी आरोपी बाबू भामे (Babu Bhame) याने  विठ्ठल पोळेकर (Vitthav Polekar)  यांचं अपहरण करुन त्यांची हत्या केली आणि त्यानंतर त्यांच्या शरीराचे अनेक तुकडे करुन वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरले. त्यानंतर पोती खडकवासला धरणात (Khadakwa) फोकून देण्यात आली होती. पोळेकर यांच्या शरिराचे काही अवयव सापडले आहेत. तर अजून काही अवयव सापडणं बाकी आहे. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.


पुण्यातील डोणजे परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. मुख्य आरोपी योगेश ऊर्फ बाबू किसन भामे हा अद्याप फरार आहे. विठ्ठल सखाराम पोळेकर असे खून झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत पोळेकर यांच्या मुलीने 15 नोव्हेंबर रोजी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल पोळेकर 14 नोव्हेंबर रोजी सकाळी सिंहगड किल्ल्याजवळ फिरण्यास गेले होते. त्यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले. आरोपी योगेश भामे याने पोळेकर यांच्याकडे आलिशान कारसह खंडणीची मागणी केली होती. पोलिसांना योगेश आणि त्याचा भाऊ रोहित किसन भामे यांनी पोळेकर यांचे अपहरण केल्याचा संशय होता. आरोपी कारमधून नाशिकच्या दिशेने गेले असून, त्यात भामे याच्यासमवेत अहिल्यानगरमधील शुभम सोनवणे आणि मिलिंद थोरात असल्याचे समोर आले. पोलिसांनी नाशिकमध्ये आरोपींचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी रेल्वेने मध्यप्रदेशमधील जबलपूरला गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी जबलपूर पोलिसांच्या मदतीने दोन आरोपींना रविवारी अटक केली.


नेमकं काय आहे प्रकरण?


सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यात गुरुवारी पहाटे 6 वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करण्यात आलं होतं. या भागातील कुख्यात गुंड बाबू मामे याने अपहरण केल्याची तक्रार पोळेकर यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर आज विठ्ठल पोळेकर यांच्या मृतदेहाचे तुकडे खडकवासला धरणाच्या पाण्यात ओसाडे गावच्या हद्दीत आढळून आले आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.