विजयनगर : कर्नाटकमधील विजयनगरमध्ये (Vijayanagara) धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. लग्न (marriage) जमत नसल्यामुळे एका तरुणाने स्वत:ला संपवलेय. कुडलिगी तालुक्यातील गुडेकोटे या गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय. लग्न जमत नसल्यामुळे 26 वर्षीय तरुण त्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला दारुचे व्यसनही (alcohol) जडले होते. त्यातच त्याने विष प्राशन करुन स्वत:ला संपवलं. या धक्कादायक प्रकारानंतर गुडेकोटे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
लग्न होत नसल्यामुळे 26 वर्षीय तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांमध्ये दु:खाचं वातावरण आहे. आईनं टाहो फोडला.. तर इतर कुटुंबियांच्या डोळ्यातही अश्रू होते. गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय तरुण लग्न जमत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होता. त्याला दारुचं व्यसनही जडलं होतं. लग्न जमत नसल्यामुळे तो तरुण दररोज दारु पीत होता. या टेन्शनमध्येच तरुणाने टोकाचं पाऊल उचलले. पोलिसांनी तरुणाच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद केलेय. त्याशिवाय पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला आहे. गावातील आणि कुटुंबातील लोकांची चौकशी केली जात आहे. आत्महत्याच केली की इतर कोणत्या कारणामुळे तो मृत झालाय? याचा तपास पोलिस करत आहेत.
लग्न जमत नसल्यामुळे तरुण त्रस होता -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुडेकोटे गावातील 26 वर्षीय बी मधुसूदन हा लग्न जमत नसल्यामुळे त्रस्त होता. त्याचं नात्यामध्ये अथवा इतर कुठेही सोयरीक जुळत नव्हती. लग्न जमत नसल्यामुळे मधुसूदन मानसिकरित्या खचला होता. या कारणामुळे त्याला दारुचे व्यसनही जडलं होतं. तो दारुच्या प्रचंड आहारी गेला होता. त्याच्या या कृत्यमुळेही त्याला मुलगी देण्यास कुणीही तयार नव्हतं. मधुसूदन याच्या या व्यवहाराची, कृत्याची गावभर चर्चा होती.
विष प्राशन करत संपवलं -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्न जमत नसल्यामुळे 26 वर्षीय मधुसूदन याने विष प्राशन केले होतं. त्याची तब्येत बिघडल्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. बेल्लारी येथील बीम्स रुग्णालयात त्याला उपचारासाठी आणलं होतं. येथे डॉक्टरांनी मधुसूदन याच्या उपचार सुरु केले. पण प्रकृती अधिक बिघडल्यामुळे मधुसूदन याचा मृत्यू झाला. मधुसूदन याने विष प्राशन करताना लग्न होत नसल्याचं सांगितलं होतं. मधुसूदन याच्या निधनानंतर कुटुंबात दुखाचं वातावरण आहे. याप्रकरणाची माहिती गुडेकोटे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मधुसूदन याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय. त्याशिवाय पोलिसांकडून याप्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.