Kanpur SBI Bank Robbery: जगात लोकप्रिय ठरलेली नेटफ्लिक्सवरील स्पॅनिश वेब सीरिज मनी हाईस्ट (Money Heist) ही क्राईम थ्रिलर वेब सिरीज जवळपास सर्वांनाच माहित आहे. मनी हाईस्टमध्ये चोरी करण्यासाठी दरोडेखोर भन्नाट शक्कल लढवत असल्याचं दाखवलं आहे. याच फिल्मी मनी हाईस्ट स्टाईलनं उत्तर प्रदेशमध्ये चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) तिजोरीवर डल्ला मारलाय. दरोडेखोरांचं (Robbery) चोरीचं प्लॅनिंग पाहून पोलिसही हैराण झालं आहे. चोरी करण्यासाठी दरोडेखोरानं चक्क आठ ते दहा फूट सूरंग खोदली होती. त्यानंतर 94 लाख रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 
 
उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये एसबीआय बँकेत चोरांनी टाकलेला दरोडा सध्या चर्चेचा विषय आहे. चोरांनी मनी हाईस्ट स्टाईलनं सुरुंग खोदून बँकेत दरोडा टाकलाय. चोरठ्यांनी एसबीआय बँकेतून जवळपास दोन किलो सोनं लंपास केलेय. शुक्रवारी ही गोष्ट उघडकीस आली. चोरांचं प्लॅनिंग पाहून पोलिसही आश्चर्यचकीत झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये या चोरीची जोरजार चर्चा सुरु आहे.


या चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चोरांनी एसबीआय बँकेच्या मागील बाजूला आठ ते 10 फूट लांब सूरंग खोदली होती. त्यानंतर बँकेतील दोन किलो सोनं लंपास केलं. पण आश्चर्याची बाब म्हणजे, चोरांनी बँकेतील रोकड रक्कमेला हात लावला नाही. चोरट्यांनी दोन किलो सोनं लंपास केलं. याची किंमत 94 लाख रुपये इतकी आहे. या चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


सध्या प्रचंड थंडी आहे. हुडहुडीमुळे बँक परिसरात शांतता आहे. याच शांततेचा फायदा घेत चोरांनी बँकेत दरोडा टाकला. एसबीआय बँकेच्या मागील बाजूला दहा फूट सूरंग खोदत चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडाच्या रॉडने स्ट्राँग रुमचा दरवाजा फोडला अन् सोनं लंपास केलं.  बँकेतील कर्मचारी सकाळी आल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल करत चोरीचा तपास सुरु केला आहे.  


पोलीस आयुक्त बीपी जोगदंड काय म्हणाले?


पोलीस आयुक्त बीपी जोगदंड म्हणाले की, या दरोड्याची माहिती शुक्रवारी सकाळी बँकेतील कर्मचारी पोहचल्यानंतर मिळाली. त्यांना स्ट्राँग रुमचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. दरोड्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर पोहचले. सिनिअर पोलीस, श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकाद्वारे घटनास्थळावर तपास करण्यात आलाय.