ठाणे : अंगावरील  दागिने  लुटण्यासाठी  चोरट्याने  घरात  घुसून  एका  60  वर्षीय  वृद्ध  महिलेचा  निर्घृण खून  केल्याची  धक्कादायक  घटना  उघडकीस आली. ही घटना कल्याण पश्चिमेतील  आंबिवली भागातील  ज्ञानेश्वर नगर खापरीपाडामधील एका चाळीच्या घरात घडली.  याप्रकरणी   खडकपाडा  पोलिसांनी  आरोपीला शिताफीनं अटक केली  आहे. चांद उर्फ अकबर महम्मद शेख असे आरोपीचं नाव आहे. तर  रंजना चंद्रकांत पाटकर असे मयत महिलेचे नाव आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने या आधीही एक खून केला होता. त्या प्रकरणात आरोपीला नऊ वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली होती. ती शिक्षा भोगल्यानंतर आरोपी तुरुंगाबाहेर आला होता. आता त्याने पुन्हा एक खून केला आहे. 

मोमोज विक्री व्यवसायासाठी पैसे हवे होते

अटक करण्यात आलेल्या आरोपीला  मोमोज विकीचा व्यवसाय करण्यासाठी  पैशांची गरज होती. याच उद्देशानं त्याने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून वृद्ध महिलेची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघडकीस आल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे. चांद उर्फ अकबर महम्मद शेख याने कल्याण कोळसेवाडी पोलिस स्टेशन हद्दीत या आधी एक खून केला होता. त्या प्रकरणात त्याला नऊ वर्षे शिक्षा  झाली होती. ही शिक्षा पूर्ण करून आठ महिन्यापूर्वी तो बाहेर आला होता.

पिण्यासाठी पाणी मागितले अन्... 

आरोपीला मोमोज विक्रीचा व्यवसाय करायचा होता. त्यासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे चांद याने आंबिवली भागातील  ज्ञानेश्वर नगर खापरीपाडामधील एका चाळीच्या घरात वृद महिलेचा खून केला. पाणी पिण्यासाठी तो तिच्या घरात गेला. ती महिला पाणी आणायला आतमध्ये गेली अशता या नराधमाने टीव्हीचा आवाज मोठा केला आणि वृद्ध महिलेचा खून केला. त्यानंतर तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून पळ काढला. 

पोलिसांना आरोपी संदर्भात कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे आरोपीला पकडण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र कसून तपास करत पोलिसांनी आरोपी चांदला अटक केली आहे.

ही बातमी वाचा: