Kalyan Crime News : ओएलएक्सवरु गाड्या विकत घ्यायचा विचार करत असाल तर सावधान व्हा...  कारण, कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. olx वर चोरीच्या गाड्या विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केलेय. त्या चोरट्यांकडे अधइक तपास केला असता 14 गुन्ह्यांची उकल केली असून त्यांच्याकडील 11 वाहने जप्त करण्यात आली.


कल्याण महात्मा फुले पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक केली. मोहम्मद अकबर अब्दुल अजीज शेख व जुनेद अब्दुल अजीज शेख अशी या दोन चोरट्यांची नावे असून दोघे सख्खे भाऊ आहेत. हे दोघे ऑनलाईन खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या olx या साईटवर विक्रीसाठी अपलोड केलेल्या दुचाकी सारखीच दुचाकी चोरी करायचे यांनतर ऑनलाईन गाडी खरेदी करण्यासाठी चौकशी करत संबंधित मालकाकडून गाडीचे कागदपत्र मागून घेत या कागदपत्रावरून चोरीच्या गाडीचे कागदपत्र तयार करायचे. त्यानंतर चोरीची गाडी olx विकायचे. या दोघांविरोधात याआधी देखील वाहन चोरीचे 14 गुन्हे दाखल आहेत. या 14 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून 11 वाहने जप्त केली आहेत. यात 2 बुलेट, 6 दुचाक्या आणी 1 रिक्षा यांचा समावेश आहे. त्यांनी अशा प्रकारे आणखी काही गाड्या विकल्या असाव्यात असा संशय पोलिसांना आहे.


कल्याण महात्मा फुले पोलिसांना एक इसम चोरीची बुलेट मोटरसायकल विकण्यासाठी कल्याण पश्चिम बैल बाजार या परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपी महम्मद अकबर शेख याला शिताफीने अटक केली. गुन्ह्यात ताब्यात घेतलेली बुलेट चोरीची असल्याचे आणि त्याची ओएल एक्स वर बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणार असल्याची माहिती पोलिसाना दिली. या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या त्याचा भाऊ अब्दुल अजीज शेख  याला देखील पोलिसांनी अटक करत या दोघांकडून पोलिसांनी कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, शीळ डायघर, मुंब्रा  पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 14 गुन्ह्यांची उकल करत चोरी केलेली 11 वाहने जप्त केली आहेत. यात 2 बुलेट, 6 दुचाक्या आणी 1 रिक्षा यांचा समावेश आहे. दरम्यान आरोपी ऑनलाईन विक्रीसाठी असलेले वाहन कॉपी करून हुबेहूब त्याच गाडीसारखी दिसणारी गाडी चोरी करायचे. यांनातर खऱ्या गाडीचे ऑनलाईन पेपर मागून घेत त्या कागदपत्राच्या आधारे बनावट पेपर बनवून त्याआधारे किंमत कमी करून या चोरलेल्या गाड्यांची विक्री olx वर करायचे. या पद्धतीने हे आरोपी गुन्हे करत असल्याची माहिती एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली.