ठाणे : कल्याण खडकपाडा परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका दाम्पत्याच्या घरामध्ये खिडकीतून घुसून अज्ञात व्यक्तीने महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर सहा तासात पोलिसांनी हल्लेखोराला बेड्या ठोकल्या. घटनेच्या ठिकाणी असलेल्या चपलेमुळे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं.
रविवारी मध्य रात्रीच्या सुमारास घराच्या खिडकीतून आत शिरून महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार कल्याण कोळवली परिसरात घडला होता. महिलेच्या गळ्यावर आणि हातावर सपासप वार करुन हल्लेखोर पसार झाला होता. जखमी महिला सोनम पाल हिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा सुरू केला त्यावेळी त्यांना पायातील एक चप्पल त्या ठिकाणी आढळून आली. याच चपलेने पोलिसांना हल्लेखोरापर्यंत पोहोचवले.
घटनेच्या ठिकाणी मिळालेली चप्पल ही कोणाची आहे याचा तपास पोलिसांनी त्या परिसरामध्ये सुरू केला. त्यावेळी एका महिलेने ती चप्पल माझ्या मुलाची आहे असे सांगितल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर गंगाधर या नराधमाला पोलिसांनी अवघ्या सहा तासात बेड्या ठोकल्या. या महिलेवर हल्ला करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्या व्यक्तीने महिलेवर घरात जाऊन हल्ला का केला याचा तपास पोलीस करत आहेत.
लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेससीची हत्या
कल्याणमध्ये एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप (Live In Relationship) मध्ये राहत असलेल्या प्रियकराने प्रेयसीची चाकूने वार करत हत्या केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाली असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कल्याण पूर्व विजय नगर येथील आमराई परिसरात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी पोहचले. घटनेचा तपास करता पोलिसांकडून ही हत्या चारित्र्याच्या संशयावरून झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. रसिका कोळंबेकर आणि विजय जाधव हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. विजयला रसिकाच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून आज विजयने रसिकावर चाकूने हल्ला करत तिची राहत्या घरी हत्या केली असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
ही बातमी वाचा: