जळगाव : प्रेमसंबंध ठेऊन लग्नास टाळाटाळ करणाऱ्या प्रियकरावर प्रेयसीने चाकू हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Jalgaon Pachora Crime ) शहरात ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. निलेश बोरसे असं त्या प्रियकराचं नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर प्रेयसीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


पाचोरा शहरातील तलाठी कॉलनी भागात रहिवासी असलेल्या निलेश बोरसे आणि एका तरुणीचे गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र या दरम्यान दोघांच्यामध्ये सातत्याने खटके उडत असायचे. निलेश लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याचं लक्षात आल्यावर सदर तरुणीने त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र निलेश तिला प्रतिसाद देत नसल्याने तरुणीने काही महिन्यांपूर्वी पाचोरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार करत गुन्हा दाखल केला होता. 


तक्रार केल्यानंतरही निलेशने लग्नासाठी प्रतिसाद दिला नसल्याने त्या तरुणीने शनिवारी रात्री निलेश बोरसे यांच्या घरी जात माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या परिवाराला सोडणार नाही अशी धमकी दिली. त्याचसोबत निले त्याच्यावर चाकू हल्ला करत त्याला जखमी केले.


या घटनेनंतर जखमी निलेश याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर प्रेयसीच्या विरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.


दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या


जिल्ह्यात पुन्हा एकदा सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, प्रेमसंबंधावरून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने हत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या  सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात ही संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. चंद्रकला धोडिंबा बावस्कर (वय 35 वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर) असे मयत महिलेचं नाव असून, तर आरोपींमध्ये महिलेचा भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर, वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई धोडिंबा बावस्कर समावेश आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकला बावस्कर यांचे प्रेमसंबंध असल्याचा तिच्या आई-वडील आणि भावांना संशय होता. दरम्यान, शनिवारी सकाळी राक्षा शिवारात शमीम शाह कासम शाह (वय 30 वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर) हे शनिवारी आपल्या शेतात काम करत होते. याचवेळी तिथे अचानक चंद्रकला बावस्कर धावत आल्या. प्रचंड घाबरलेल्या चंद्रकला यांनी 'माझे भाऊ आणि आई वडील प्रेमसंबंधांच्या कारणावरून माझा जीव घेणार आहे. त्यामुळे, मला वाचवा, कोठे तरी लपवा, अशी त्यांनी शमीम यांच्याकडे विनवणी केली. त्यामुळे शमीम यांनी तिला त्यांच्या बकऱ्याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले. 


ही बातमी वाचा: