Jalgaon Crime News जळगाव : नेपाळी नोकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने मालकाच्या घरातील ऐवज लुटून (Robbery) नेल्याची घटना जळगाव शहरात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस (Police) संशयितांचा शोध घेत आहेत. 


याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवाजीनगर (Shivaji Nagar) भागात राहणाऱ्या राजा मयुर यांच्याकडे विकास नावाचा नेपाळी नोकर काम करत होता. त्याने राजा मयुर यांच्या सोबत त्यांच्या घराला पहारा देणाऱ्या नोकरांना गुंगीचे औषध असलेले सरबत पाजून बेशुद्ध केले. तर मालकीण या सरबत पित नसल्याने त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांना खोलीत कोंडून ठेवले. 


सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास


त्यानंतर  घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह काही रोकड घेऊन विकास हा पसार झाला आहे. या घटनेत राजा मयूर आणि त्यांचे सुरक्षा रक्षक हे तिघेही बेशुद्ध असल्याचं लक्षात आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.तिघांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या घटनेतील विकास नेपाळी आणि त्याच्या साथीदारांना शोध घेत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या