Imtiaz Jaleel: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या टीसीएस (TCS) लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात (Conversion Case) एक मोठी घडामोड समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी निदा खान (Nida Khan) हिला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल (Mateen Patel) यांची आत्तापर्यंत विशेष तपास पथकाकडून (SIT) तीन वेळा कसून चौकशी करण्यात आली आहे. मतीन पटेल यांच्या जप्त केलेल्या मोबाईलमधून मिळालेल्या डेटाच्या (Mobile Data) आधारे अनेक धक्कादायक खुलासे समोर आले असून, या प्रकरणात आता माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांना देखील एसआयटीकडून चौकशीसाठी बोलवले जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे.

Continues below advertisement

Nashik TCS Case: 8 आरोपींना अटक, पुरवणी दोषारोपपत्राची तयारी

या संवेदनशील आणि गंभीर गुन्ह्यामध्ये एसआयटीने आत्तापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक (Arrested) केली असून, त्यांच्याविरुद्ध न्यायालयात मुख्य दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्यात आले आहे. मोबाईल डेटा आणि तांत्रिक तपासातून समोर आलेल्या नवीन पुराव्यांच्या आधारे, पोलीस येत्या काही दिवसांत न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र देखील दाखल करणार आहेत.

Matin Patel on Imtiaz Jaleel: मतीन पटेलने फेटाळले आरोप; 'पॉलिटिकल' कनेक्शनवर स्पष्टीकरण

दुसरीकडे, आरोपी निदा खानला घर मिळवून दिल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या मतीन पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव या प्रकरणात जोडले जात असल्याच्या दाव्यांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातेवाईक (Relative) असल्याचा आरोप साफ चुकीचा आणि निराधार आहे, असे पटेल यांनी स्पष्ट केले.

Continues below advertisement

SIT च्या चौकशीदरम्यान निदा खानशी ओळख कशी झाली, यावर बोलताना मतीन पटेल म्हणाले की, "निदा खानला मी यापूर्वी कधीही भेटलो नव्हतो. तिचे आई-वडील काही कौटुंबिक वादाचे कारण सांगत माझ्याकडे आले होते. ती गर्भवती (Pregnant) असल्याने मानवी दृष्टिकोनातून मदत म्हणून मी तिच्या राहण्याची व्यवस्था केली होती. मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही," असे त्यांनी म्हटले.

Matin Patel on Imtiaz Jaleel: माजी खासदारांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न: पटेल

या प्रकरणात इम्तियाज जलील यांना विनाकारण राजकीय हेतूने गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे देखील मतीन पटेल यांनी म्हटले आहे. "इम्तियाज जलील हे माझे राजकीय नेते आहेत. त्यांच्याशी माझ्या फोनवर केवळ वैयक्तिक किंवा राजकीय कारणांवरूनच चर्चा झाली आहे, निदा खान प्रकरणात कोणताही संपर्क झालेला नाही. माझ्या फोनचे सर्व कॉल रेकॉर्ड्स पोलिसांकडे उपलब्ध आहेत," असा दावा करत या प्रकरणात न्यायालयीन लढा लढणार असल्याचे मतीन पटेल यांनी सांगितले. मात्र, एसआयटीला मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांमुळे आता इम्तियाज जलील यांनी चौकशी होणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nida Khan-Mateen Patel Nashik TCS Case: निदा खान माझ्या ऑफिसमध्ये आली आणि म्हणाली...; मतीन पटलेने सांगितली भेटीची A टू Z माहिती