HSC Paper Leak Case : बारावी पेपर फुटी प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. बुलढाण्यात पेपर फुटीसाठी (Paper Leak) व्हॉट्सॲपचा (Whatsapp) वापर केल्याचं समोर आलं आहे. व्हॉट्सॲप ग्रुप (Whats App Group) बनवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणा प्रकरणात दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 12 हजार रुपये घेतले जात असल्याची, माहितीही सूत्रांकडून समोर येत आहे.


बारावी पेपर फुटी प्रकरण, व्हॉट्सॲप ग्रुप बनवून कॉपी


बारावी पेपर फुटी प्रकरणी तपास सुरु असून आहे. व्हॉट्स ॲप ग्रुप बनवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 99 जणांचा व्हॉट्सॅप ग्रुप बनवून त्यामध्ये पेपर लीक केल्याचं उघडकीस आलं आहे. या ग्रुपमध्ये शिक्षक , काही विद्यार्थी , विद्यार्थ्यांचे पालक व विविध क्षेत्रातील काही व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पेपर फुटीची घटना समोर आल्यावर हा संबंधित व्हॉट्सॅप ग्रुप डिलीट करण्यात आला. याबाबत पोलिसांच्या सायबर सेलकडून अधिक तपास सुरु आहे. सायबर सेलकडून डिलीट करण्यात आलेल्या डेटा लवकरात लवकर रिकव्हर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.


बारावीच्या गणिताच्या पेपरफुटीची मुंबई कनेक्शन


बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचा संबंध मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणित पेपरचा काही भाग आढळला आहे. डॉ. अँथोनी डिसिल्वा हायस्कूलमधील परीक्षार्थीच्या मोबाईलमध्ये दहा वाजून 17 मिनिटांनी गणिताचा पेपर सापडला. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे. 


बुलढाण्यात फुटला गणिताचा पेपर


बारावी बोर्डाचा आज गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पानं सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली होती. याबाबतची बातमी आज सर्व वृत्तवाहिन्यावरून प्रसिध्द झाली. दरम्या, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेलं नव्हतं नाही. यामुळे इयत्ता 12 वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणिताच्या पेपरची काही पानं आढळल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


HSC Exam : बारावीच्या गणिताच्या पेपरफुटीची मुंबई कनेक्शन; विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये पेपर, तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI