पुणे: दिवाळीच्या रात्री आपल्या कुटुंबीयांसोबत आंनद साजरा करत असताना, फटाके उडवीत असतानाच तरुणावर काळाने घाला घातला. आंनदात असणाऱ्या कुटूंबावर काही क्षणात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. फटाके उडवीत असतानाच रस्त्यावरून एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाने 38 वर्षाच्या तरुणाला जोरदार धडक दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. यात तरुणाचा मृत्यू झाला. 

Continues below advertisement


मिळालेल्या माहितीनुसार, रावेत येथील फेलिसिटी सोसायटी समोर सोहम पटेल हा 38 वर्षाच्या तरुण आपल्या कुटुंबीयांसोबत फटाके उडवीत होता.त्यावेळी एका भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी वाहन चालकाने त्याला चिरडून पळ काढला आहे. या अतिशय दुर्दैवी अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. दिवाळीसारख्या आनंददायी सणाच्या दिवशी पटेल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात होऊन जवळपास 48 तास झाल्यानंतरही या अपघातातील आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलं नसल्याने रावेत परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. रावेत पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाला तात्काळ अटक केली नाही तर, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा रावेत परिसरातील नागरिकांनी दिला आहे.