Hingoli: राज्यात सध्या वाळूमाफियांची वाढती दहशत मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे .अवैध वाळू उपशातून वाढलेली गुंडागर्दी, वाळू तस्करांची मुजोरी वाढत असताना काही दिवसांपूर्वी हिंगोलीच्या सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पद्माकर खंदारे यांची वाळू तस्करासोबत रील व्हायरल झाली आहे. सेनगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले एक पोलीस अधिकारी या वाळू माफियासोबत बसलेले असल्याचा रील्स सध्या समोर आला असून स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गळ्यात सोन्याच्या माळा, गॉगल, टेबलावर पैसे ठेवत दहशत माजवणाऱ्या वाळू माफियाच्या घरात बसलेला असतानाचा ही रील समोर आल्याने सेनगावात मोठी खळबळ उडालीय. नागरिकांनी या पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी असे निवेदन पोलीस अधीक्षकांकडे दिले आहे. तर दुसरीकडे आरोपीला पकडण्यासाठी गेलो असता तेव्हा कोणीतरी व्हिडिओ केला .वाळू माफी अशी कोणताही संबंध नाही असे म्हणत या पोलीस अधिकाऱ्याने सारवा सारव केल्याचे समोर आले आहे .
वाळू माफियांची मुजोरी कायम समोर येत असते.. असे प्रकार वारंवार घडताना दिसतात. रात्रीच्या वेळी नदीतून वाळू उपसा करत वाहतूक केली जात असते. कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना देखील हे जुमानत नसल्याचे समोर आले आहे. मागील महिन्यात जळगाव जिल्ह्यात देखील रात्रीच्या सुमारास नदीतून वाळू उपसा केला जात असताना कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यानंतर हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
नक्की प्रकरण काय ?
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एक वाळू माफिया भाऊ राठोड हा अवैध रेती उपसा करतो .त्यामधून मिळालेल्या पैशाचे रील करतो .गळ्यात सोने घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो .याच भाऊ राठोड सोबत सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पद्माकर खंदारे यांचे रील व्हायरल झाले होते . या रीलनंतर वाळू तस्करांना पोलिसांचंच पाठबळ असल्याची चर्चा वाढली .या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सेनगाव येथील स्थानिकांनी केली होती .हिंगोली जिल्ह्याचा बीड होऊ देऊ नका असे निवेदन सेनगाव येथील काही स्थानिकांनी पोलीस अधीक्षकांना दिले होते .यारील वरून आता संबंधित पोलीस अधिकाऱ्याने एका केस संदर्भात फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वाशिमला गेलो होतो .तेव्हा एका व्यायाम शाळेमध्ये गेले असता तेथील नागरिकांना या संदर्भात विचारणा करत असताना एका ठिकाणी बसलो होतो .माहिती घेऊन मी परत निघालो .वाळू माफीयाशी माझा कोणताही संबंध नाही असे म्हणत पोलीस अधिकाऱ्याने या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सारवा सारव केली आहे .
रिल्सच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने काही आरोपी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच पद्धतीने हिंगोली जिल्ह्यातही 'भाऊ राठोड' नावाचा वाळू माफिया रिल्स तयार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात भाऊ राठोड नावाचा वाळू माफिया रेती उपसा बंद असतानाही राजरोसपणे अवैध रेती उपसा करत आहे. अवैध रेती उपशातून मिळालेला पैसा दाखवत, त्या पैशाचे व्हिडिओ (रिल्स) तयार करून तो आपल्या अवैध व्यवसायाचे उदात्तीकरण करत असताना पोलिस अधिकाऱ्यासोबत रील व्हायरल होणे अत्यंत गंभीर आहे..
हेही वाचा: