IRS Officer Sachin Sawant News : आयआरएस अधिकारी सचिन सावंत (IRS Officer Sachin Sawant) यांना अखेर हायकोर्टानं (High Court) दिलासा दिला आहे. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महसूल विभागात असताना मिळकतीपेक्षा 204 टक्के जास्त मालमत्ता जमा केल्याच्या आरोपात ईडीनं जून 2023 मध्ये सचिन सावंत यांना यांनी अटक केली होती. आरोपी गेल्या वर्षभरापासून तुरुंगात होता.


मिळकतीपेक्षा 204 टक्के जास्त मालमत्ता जमा केल्याच्या आरोपात अटक 


दरम्यान, हा खटला लवकर सुरू होऊन तो संपण्याची चिन्ह नाहीत असं हायकोर्टाचं निरिक्षण आहे. महसूल विभागात असताना मिळकतीपेक्षा 204 टक्के जास्त मालमत्ता जमा केल्याच्या आरोपात ईडीनं जून 2023 मध्ये सावंत यांना अटक केली होती. बेकायदा संपत्ती बाळगल्या प्रकरणी मुंबई पोलीसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला होता. याच गून्ह्याच्या आधावार ईडीनं कारवाई केली होती.  


प्रकरण नेमकं काय?    


वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यापूर्वी ईडी मुंबई झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होते. काही हिरे कंपन्यांद्वारे 500 कोटी रुपये बेकायदेशीरपणे वळवल्या प्रकरणी ED मध्ये असताना त्यांनी चौकशी केली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीनं सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) नं सचिन सावंत यांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल (FIR) ची नोंद केली होती. सध्या सावंत यांच्याकडे सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात अतिरिक्त आयुक्त पद आहे.


500 कोटी रुपये बेकायदेशीररित्या वळवल्याचे प्रकरण


सचिन सावंत यांच्या मुंबईतील (Mumbai) निवासस्थानावर ईडीकडून  छापा टाकण्यात आला होता.  500 कोटी रुपये बेकायदेशीररित्या वळवल्याच्या एका प्रकरणातील आरोपीनं सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. बेकायदा संपत्ती बाळगल्या प्रकरणी मुंबई पोलीसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला होता. त्यावरून सीबीआयनं (CBI) एफआयआर (FIR) दाखल केली. आणि याच प्रकरणी ईडीनं (ED) छापेमारी केली होती. छापेमारीनंतर ईडीनं जून महिन्यामध्ये सचिन सावंत यांना अटकही केली होती. गेल्या वर्षभरापासून आरोपी सचिन सांवत हे तुरुंगात होते. मात्र, आज अखेर सचिन सावंत यांना हायकोर्टानं (High Court) दिलासा दिला आहे. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Sachin Sawant: IRS अधिकारी सचिन सावंत यांनी कोची येथे 15-20 वेळा मल्याळम अभिनेत्री नव्या नायरची भेट घेतली: ईडी