Gujrat Cocaine Recovered : गुजरात पोलिसांना अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई (Cocaine Seized) करण्यात यश आलं आहे. गुजरातमध्ये पोलिसांनी 800 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त (Drugs Seized) केले आहे. कच्छ जिल्ह्यातील गांधीधाममध्ये पोलिसांनी 80 किलोचं कोकन जप्त केलं आहे. याची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत 800 कोटी रुपये आहे. 


गुजरात पोलिसांना मोठं यश


एनएआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांनी किनार्‍यावरून 80 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 800 कोटी रुपये आहे. सुत्रांकडून यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी शोध सुरु केला. यावेळी पोलिसांना समुद्रात लावारिसपणे अंमली पदार्थांची पाकीटे सापडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


800 कोटींचे अंमली पदार्थ जप्त






या प्रकरणी अधिक तपास सुरु


पोलिसांना अंमली पदार्थ तस्करी संदर्भात सुत्रांकडून माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला आणि ड्रग्स तस्करांचा प्लॅन उधळून लावला. पोलिसांच्या भीतीने तस्करांना 80 किलोंचे ड्रग्स समुद्री किनारी लावरीसपणे टाकून पळ काढल्याचा अंदाज आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


सुत्रांकडून ड्रग्जच्या डिलिव्हरीबाबत माहिती


पोलीस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितलं की, पोलिसांना ड्रग्जच्या डिलिव्हरीबाबत माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या पथकाने शोधमोहीम तीव्र केली. यावेळी आम्ही समुद्र किनाऱ्यावरून कोकेनची 80 पाकिटे जप्त केली. या ड्रग्सची किंमत 800 कोटी रुपये आहे.


प्रत्येकी 1 किलोची 80 पाकिटे जप्त


पोलिसांनी माहिती देत सांगितलं की, गांधीधाम शहराजवळील खाडीच्या काठावर 80 पॅकेटमध्ये कोकेन सापडलं आहे. प्रत्येक पॅकेटचे वजन एक किलोग्रॅम आहे. कच्छ-पूर्व विभागाचे पोलीस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितलं की, कदाचित पकडले जाण्याच्या भीतीने तस्करांनी येथे ड्रग्ज टाकून पळ काढला असावा, कारण पोलीस या ठिकाणी लक्ष ठेवून होते.






गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "गांधीधाम पोलिसांनी 80 किलो कोकेन जप्त केलं, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 800 कोटी रुपये आहे. या यशाबद्दल मी डीजीपी आणि गांधीधाम पोलिसांचे अभिनंदन करतो."