Customer Care Number : इंटरनेटचा (Internet) वापर झपाट्याने वाढत आहे. तुम्ही इंटरनेटवर काहीही सहज शोधू जगता. यामुळे संपूर्ण जग जवळ आलं आहे. पण याचे काही तोटेही आहेत. कारण इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. लोकांना फसवण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या पद्धती वापरताना दिसत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. इंटरनेटवरील एक सर्च आणि नोएडातील एका दाम्पत्याला आठ लाखांहून अधिक रुपयांसाठी मुकावं लागलं आहे.
एक Google सर्च आणि खात्यातून आठ लाख गायब
हॅकर्स इंटरनेटवर अवलंबून असल्यांचा फायदा घेतात आणि त्यांची फसवणूक करतात. नोएडातील एका दाम्पत्याची आठ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. फसवणूक करण्यासाठी सायबर फ्रॉड्स बनावट नंबरचा वापर करतात. एका ऑनलाईन सर्चमुळे या व्यक्तीला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. या दाम्पत्याच्या अकाऊंटवरुन 8.24 लाख रुपये गायब झाले आहेत.
ज्येष्ठ दाम्पत्याची फसवणूक
नोएडातील ज्येष्ठ दाम्पत्याच्या फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे. हे दाम्पत्य व्यक्ती त्यांच्या डिशवॉशरसाठी ग्राहक सेवा क्रमांक (Customer Care Number) ऑनलाईन शोधत होते. पीडित दाम्पत्य नोएडाच्या सेक्टर 133 मध्ये राहते. तक्रारीनुसार, ऑनलाईन फसवणुकीची ही घटना 22 जानेवारी आणि 23 जानेवारी रोजी घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे.
कशी झाली फसवणूक?
पोलिसांत दाखल एफआयआरनुसार, अमरजीत सिंह आणि त्यांची पत्नी गुगलवर IFB डिशवॉशरचा कस्टमर केअर नंबर (Customer Care Number) शोधत होते. त्यांच्या पत्नीने 1800258821 हा क्रमांक ऑनलाइन सर्चमधून काढला, जो IFB कस्टमर केअरच्या नावाने गुगलवर होता. या मोबाईलवर फोन केला असता. एका महिलेने फोन उचलला आणि उच्च अधिकाऱ्यांकडे कॉल फॉरवर्ड केला. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याने महिलेला AnyDeskApp डाऊनलोड करण्यास सांगितलं आणि काही माहिती विचारली. या नंतर महिलेला 10 रुपये फी भरुन डिशवॉशर संबंधित तक्रार दाखल करण्यास सांगितले. यावेळी कस्टमर केअर नंबरवरील फोन सातत्याने कट होत होता.
त्यामुळे अधिकारी वैयक्तिक नंबरवरुन फोन केले. त्यांनी पर्सनल मोबाईल नंबरवरुन सात फोन केले. यानंतर त्याच दिवशी दुपारी 4 वाजता वृद्धाच्या बँक अकाऊंटमधून 2.25 लाख रुपये गायब झाले. इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी 5.99 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याच्या मेसेज वृद्ध दाम्पत्याला आला. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :