Gondia Crime News : गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेणं चांगलंच भोवलं आहे. अवघ्या 8 हजारांची लाच घेताना गोंदियाच्या (Gondia Crime) लुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात (ACB Trap) पकडले आहे. अनिल पारधी (वय 54 वर्ष) असे लाच स्वीकारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (Anti Corruption Buero) महिन्याभरातली ही तिसरी मोठी कारवाई आहे.


तक्रारदार यांच्यावर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल असून तक्रारदार आणि गैरअर्जदार यांच्यात समझौता करून दिल्याचा मोबदल्यात 10 हजार रुपयाची लाच मागितली होती. मात्र, तडजोडी अंती 8 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले आहे. सध्या घडीला गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 


8 हजारांची लाच घेणं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला  भोवलं


गेल्या 7 मे 2024 रोजी गोरेगाव तहसीलदार, नायब तहसीलदार आणि एका खाजगी इसमाला लाच घेताना पकडण्यात आले होते. तर 14 मे 2024 ला गोंदियाच्या सडक अर्जुनी येथील नगरपंचायतीमध्ये नगरपंचायत मुख्याधिकारीसह नगराध्यक्ष आणि नगरसेवक अशा 6 लोकांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा पोलीस विभागातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची महिन्याभरातली ही तिसरी मोठी कारवाई आहे.


महिन्याभरातली ही तिसरी मोठी कारवाई


नुकतेच कुक्कुट पालन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या शेड बांधकामाचे बिल काढून देण्याच्या नावावर लाच घेणाऱ्यांना मदत केल्या प्रकरणी पशुधन पर्यवेक्षकाला रंगेहात पकडले होते. या प्रकरणी गोंदिया (Gondia News) पंचायत समितीतील पशुधन पर्यवेक्षक तेजराम हौसलाल रहांगडाले (वय 57 वर्ष) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption Buero) अटक केली होती. गेल्या वर्षी 3 ऑगस्ट 2023 ला 10 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पशुधन विकास अधिकाऱ्याला मदत केल्याच्या  आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. तर तपसाअंती घटनेच्या तब्बल 9 महिन्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही अटकेची कारवाई केली होती.


तर त्याआधी गोंदिया (Gondia News) जिल्ह्यातील गोरेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  (ACB Trap)अशीच एक मोठी कारवाई केली होती . यात गोरेगावचे तहसीलदार किसन भदाणे यांच्यासह नायब तहसिलदार नागपुरे आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतले होते. गोरेगाव तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी गोरेगाव तालुक्यातील गिधाडी या गावातील एका फिर्यादीने तक्रार दिली होती. दिलेल्या या तक्रारीनुसार तहसीलदार भदाने यांनी नायब तहसीलदार नागपुरे यांच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार दिली होती.


यात गोरेगावचे तहसीलदार किशन के. भदाणे, नायब तहसिलदार नागपुरे आणि गणवीर नामक एक खाजगी व्यक्तीचा समावेश आहे. हे प्रकरण उघडकीस येताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात या तिघांनाही ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज पुन्हा पोलीस विभागातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या