गडचिरोली : पोलिसांनी (Gadchiroili Police) माओवाद्यांचा (Naxal) घातपाताचा मोठा डाव उधळला आहे. टिसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने प्रेशर कुकरमध्ये ठेवलेले 2 किलो स्फोटक साहित्य नष्ट केले आहेत. ही घटना आज, 19 फेब्रुवारीच्या दुपारी कोटगुल पासुन अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या पहाडीजवळ घडली. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून पुन्हा एकदा नक्षल्यांचा (Naxal) घातपात करण्याचा मानस पोलिसांनी उधळून लावला आहे. 


प्रेशर कुकरमध्ये 2 किलो स्फोटक


गडचिरोली-भामरागड सारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागात नक्षलांच्या कायम छुप्या कारवाया होत असतात. मात्र गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी वेळोवेळी हा छुप्या कारवायांना सडेतोड उत्तर देत त्यांचा डाव उधळून लावला. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील धानोरा तालुक्यातील बोधी टोलाजवळ झालेल्या पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली पोलिसांना यश आले होते. विशेष बाब म्हणजे या चकमकीत मोस्ट वाँटेड असलेला जहाल नक्षलवादी दुर्गेश वट्टी याचा देखील खात्मा करण्यात आला होता. चार वर्षांपूर्वी जांभूळखेडा येथे स्फोट घडवून नक्षल्यांनी 15 पोलीस जवानांना ठार केले होते. या घटने मागे मुख्य सूत्रधार असलेल्या कसनसूर दलमचा उप-कमांडर दुर्गेश वट्टीची ओळख पटली होती. 


कोटगुलपासून अवघ्या 500 मीटर अंतरावरील घटना


या घटनेनंतर नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले होते आणि काही अंशी नक्षल कारवाईला पायबंद लागला होता. त्यानंतर पुन्हा छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत 13 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली होती. यात तीन जवानांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले होते. त्यानंतर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क राहून या भागात विशेष मोहीम राबवित आहे. मात्र कायम धुमसत असलेल्या नक्षल प्रभावित क्षेत्रात नक्षली नव नविन मनसुबे रचत असतात. टि. सी. ओ. सी. कालावधीच्या पाश्वभुमीवर असाच एक घातपाताचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.  


घातपाताचा मोठा डाव पोलिसांनी उधळला


गडचिरोली जिल्ह्यात माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र आणि स्फोटक साहित्यांचा वापर करत असतात. तसेच हे सर्व साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताहात, तसेच इतर प्रसंगी केला जातो. गडचिरोली पोलीस दलाने अश्याच प्रकारच्या माओवाद्यांचा मोठा घातपाताचा डाव उधळुन लावला आहे. सर्च मोहीम दरम्यान पोलिसांना एका प्रेशर कुकरमध्ये ठेवलेले 2 किलो स्फोटक आढळून आला आहे. त्यानंतर पोलिसांनी हे साहित्य जप्त करत नष्ट केले आहेत. मात्र या घटनेनंतर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क राहून परिसरात तपास करत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या