मुंबई : मुंबई पोलिसांनी दोन  अट्टल आणि शक्कल लढविणाऱ्या सोनसाखळी चोरांना अटक केली आहे. जे सोनसाखळी चोरी करून काही वेळात वेषांतर करून  गुन्हा केलेल्या विभागातून बाहेर पडत असे. या आरोपींना देखील पोलिसांनी देखील वेटरचे वेषांतर करूनच अटक केली आहे. 


भांडण एकाशी, हत्या दुसऱ्याची! टी शर्ट साम्यामुळे तरुणाला गमवावा लागला जीव


हैदरअली शेरअली सारंग आणि मोहम्मद हुसेन हाजी हानिफ हाकम अशी या अटक सोनसाखळी चोरांची नावे आहेत. घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्व द्रुतगती मार्गावर मुक्ताबाई हंचाटे या जेष्ठ महिलेची दुचाकीवरून येऊन या आरोपींनी रक्षाबंधनच्या दिवशी मंगळसूत्र  हिसडा मारुन लांबवले. याच पद्धतीने एकाच वेळी तीन ठिकाणी  सोनसाखळी चोरी झाल्या होत्या. त्यामुळे या बाबत पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले होते.



 या पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला असता पोलिसांना चकवा देण्यासाठी या आरोपींनी एक शक्कल लढविल्याचे समोर आले. हे आरोपी एक गुन्हा केल्यानंतर तात्काळ वेषांतर करीत होते. काही वेळाने कपडे, बूट , वेशभूषा  बदलत असत. यामुळे पोलिसांना चकवा देणे या आरोपींना शक्य होते. मात्र पंतनगर पोलिसांनी मात्र या आरोपींचा शिताफीने शोध घेतलाच. त्यांनी साकीनाका येथे एका पे अँड पार्क मधून दुचाकी नेण्यास आलेल्या आरोपी हैदरअलीला अटक केली. तर हैदरअलीला केएफसीमध्ये भेटण्यास आलेल्या आरोपी मोहम्मद हुसेनला देखील अटक करण्यात आले. या वेळी पंतनगर पोलिसांच्या पथकाने केएफसीमध्ये वेटरचे वेषांतर करून पाळत ठेवली. आरोपी हुसेन केएफसीमध्ये येताच वेटरच्या गणवेशात काम करणाऱ्या पोलिसांनी आरोपी हुसेनला देखील बेड्या ठोकल्या. हे दोन्ही आरोपी अट्टल गुन्हेगर असून मुंबई , महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यात देखील त्यांनी ही वेषांतरची शक्कल लढवून सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहेत. या बाबत आता पंतनगर पोलीस पुढील तपास करत आहे.