Indian-origin Doctor in Britain: ब्रिटनमध्ये राहणारा भारतीय वंशाचा एक व्यक्ती महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्यानंतर न्यायालयाने आरोपी व्यक्तीला चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ब्रिटनच्या एडिनबर्ग उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात 39 वर्षीय भारतीय वंशाच्या डॉक्टर मनेश गिलला दोषी ठरवले होते. त्यानंतर आता त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.


पीडित महिलेने तीन वर्षांपूर्वी भारतीय वंशाच्या डॉक्टरवर गंभीर लैंगिक आरोप केले होते. ज्यामध्ये प्रदीर्घ सुनावणीनंतर ज्युरी सदस्यांनी मनेश गिलला दोषी ठरवून चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात महिलेने न्यायालयात सांगितले की, विवाहित डॉक्टरने टिंडर या ऑनलाइन डेटिंग अॅपवर दुसऱ्या नावाने आपली ओळख करून दिली होती.


महिलेच्या म्हणण्यानुसार, भारतीय वंशाचे डॉक्टर मनेश गिलने टिंडर या ऑनलाइन डेटिंग अॅपवर स्वतःला 'माईक' म्हटले होते. जिथे त्यांची मैत्री झाल्यानंतर डॉक्टरांनी महिलेला स्टर्लिंग येथील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. या हॉटेलमध्ये मनेशने महिलेवर अतिप्रसंग केला. महिलेच्या म्हणण्यानुसार, ही घटना तिच्यासोबत 2018 मध्ये घडली होती. पोलिस स्कॉटलंडच्या पब्लिक प्रोटेक्शन युनिटचे डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर फोर्ब्स विल्सन म्हणाले की, मनेश गिलने त्याच्या चुकीचे परिणाम भोगण्यासाठी तयार राहावे. तसेच जे कोणी लैंगिक आरोपात दोषी आहेत, त्यांनाही लवकरच शिक्षा होईल.






याबाबत आपली बाजू मांडताना डॉक्टर मनेश गिल म्हणाला की, त्याने कोणतीही जबरदस्ती केली नाही. दोघांच्या संमतीने त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. न्यायालयातील ज्युरींनी लैंगिक गुन्ह्यासाठी गिलला दोषी ठरवले आणि त्याला शिक्षा सुनावली.