धुळे :  भाचा सारखा रडत असल्याने  संतप्त झालेल्या मामाने भाच्याला ड्रममध्ये  बुडवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  धुळे शहरातील (Dhule News)   फिरदोस नगर येथे घडली आहे.  याप्रकरणी पोलिसांनी 22 वर्षीय मामाला अटक केली आहे. नुरूल अमीन असे मामाचे नाव आहे.  याप्रकरणी चाळीसगाव रोड (Chalisgaon Road Police Station)  पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. 


 फिरदोस नगरातील रातराणी चौकात राहणारी मरियम बी एजाज हुसेन  ही महिला आपल्या माहेरी आई-वडिलांकडे गेली होती  त्यावेळी मामा-भाचे खेळत होते. मात्र मामाकडे आलेला मोहम्मद हाजीक एजाज हा रडू लागला होता. काही केल्या तो शांत होत नव्हता. मोहम्मदच्या आवजाचा त्याचा त्रास  मामा नुरूल अमीन याला झाला. संतापलेल्या मामाने त्याला बाथरूममधील प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकले. काही वेळाने मोहम्मद घरात दिसत नसल्याने त्याची आई मरियम बी एजाज अहमद त्याला शोधू लागली. 


नेमकं घडले काय?


घरभर शोधल्याने मुलगा दिसला नाही त्यामुळे आई अस्वस्थ झाली. कदाचित लहान मुले पाणी खेळण्यासाठी बाथरुमकडे गेल्याची शंका आली. मुलाला  शोधत बाथरूम पर्यंत गेली असता आपल्या चार वर्षीय मोहम्मद ड्रममध्ये आढळला.  ड्रममध्ये डोके पाण्यात आणि पाय वर अशा स्थितीत मिळून आलाय.  याबाबत नुरुल याला विचारणा केल्यावर त्याने मोहम्मद रडत असल्याने माझे डोके दुखत होते म्हणून आपण त्याला ड्रममध्ये टाकल्याचे कारण सांगितले.


घडलेल्या प्रकारानंतर नातेवाईक संतप्त


आईने घटनेची माहिती नातेवाईकांनी दिली. नातेवाईकांनी मोहम्मदला तात्काळ हिरे रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर  डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  याप्रकरणी नुरल अहमद याच्यावर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


गेल्या 11 महिन्यांत 371 मुलं बेपत्ता


नवी मुंबई क्षेत्रात मागील 11 महिन्यांत एकूण 371 मुलं बेपत्ता झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. यातील 325 प्रकरण सोडवण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आलं आहे. याप्रकरणी सापडलेले सहा जण घरातून रागावून किंवा बाहेर फिरण्यासाठी म्हणून गेले होते, अशी माहिती कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर समोर आली आहे. दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्याशी संवाद साधावा, असं आवाहन नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी केलं आहे.


हे ही वाचा :