Bank Holiday on Buddha Purnima 2024: त्यामुळे तुम्ही आज बँकेशी संबंधित काही काम करणार असाल तर थांबा. कारण बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज (23 मे) बँकांना सुटी आहे. भारतीय रिजर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) सुट्ट्यांच्या यादीनुसार गुरुवारीद देशातील अनेक राज्यांत बँका बंद असतील. त्यामुळे अनेक बँकांत कोणतेही कामकाज होणार नाही. या आठवड्यात 25 आणि 26 मे (Bank Holiday in May 2024) रोजीदेखील बँका बंद असतील.


बुद्ध पौर्णिमेमुळे या राज्यांत बँका बंद राहणार


भारतीय रिझर्व्ह बँक दरवर्षी सुट्ट्यांची एक यादी जाहीर करते. या यादीनुसार 23 मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त अनेक राज्यांतील बँका बंद असतील. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील बँका आज बंद असतील. देशातील भोपाळ, चंडीगड, डेहराडून, ईटानगर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, राजपूर, रांची, शिमला श्रीनगर या ठिकाणीदेखील बँका बंद असतील.  


मे महिन्यात आणखी किती दिवस बँका बंद 


मे महिन्यात अनेक सुट्ट्या आहेत. आगामी काळात 25 मे रोजी चौथा शनिवार आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यातं बँका बंद अशतील. त्यानंतर 26 मे रोजी रविवार आहे. त्यामुळे या दिवशीही देशातील सर्व बँका बंद असतील. त्यामुळे तुम्ही बँकांशी संबंधित काही काम करत असाल, तर या सुट्ट्या लक्षात घेऊनच या कामांचे नियोजन केले पाहिजे.


बँकेला सुट्टी असली तरी चिंता नाही


जवळजवळ प्रत्येकालाच बँकेत जावे लागते. मात्र बँकांच्या सुट्ट्यांमुळे सामान्यांची अनेक कामे अडकतात. मात्र सध्या डिजिटलयाझेशनमुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आज बुद्ध पौर्णिमेमुळे बँकांना सुट्टी असली तरी नेट बँकिंग, फोन बँकिंगच्या माध्यमातून लोकांना त्यांची कामे करता येणार आहेत. यूपीएयच्या माध्यातूनही पैशांचे व्यवहार करता येतील. एटीएमच्या माध्यमातून पैसे काढता येतील. 


हेही वाचा :


आरबीआय देणार केंद्र सरकारला 2 लाख कोटींचा लाभांश, गेल्या वर्षांच्या तुलनेत तब्बल 140 टक्क्यांची वाढ!


निवडणुकीच्या काळात कोणता म्यूच्यूअल फंड योग्य, गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी?