Daund Accident News : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील मेलझर केमिकल प्रा. लि. कंपनीत बांधकाम सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. यात सुरक्षा भिंत कोसळून (Accident News) दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे. ही घटना 16 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. जयकुमार रामचंद्र मुंडफणे आणि अक्षय भानुदास मोरे असे गुन्हा दाखल असल्यांची नावे आहेत.

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ममतादेवी सुदाम दास वय 27 वर्षे, सोनीदेवी सरयु कुमार वय 28 वर्षे, अशी मृत महिला कामगारांची नावे असून त्या दोघी ही सध्या दौंड तालुक्यातील मुकादमवाडी पांढरेवाडी येथे राहत होत्या. त्या मुळच्या मध्य प्रदेशातील आहेत. तर गितादेवी बाबुलाल कोल या महिला कामगार जखमी असून तिच्यावर पिरॅमिड हॉस्पिटल दौंड येथे उपचार सुरू आहेत.

Daund Accident News : ढिगाऱ्याखाली दबून दोन महिला कामगारांचा मृत्यू, एक गंभीर 

मिळालेल्या माहितीनुसार, संजय धनीराम नगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भिंतीचे बांधकाम ओले असतानाच बाहेरील बाजूने जेसीबीने माती भरल्याने मातीचा भरावामुळे दबाव वाढल्याने भिंत आतील बाजूस कोसळली. कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली वरील 3 महिला अडकल्या होत्या. तिथे उपस्थित असणारे नागरीकांच्या यांच्या मदतीने भिंतीच्या ढिगाऱ्याखालून महिलांना बाहेर काढून उपचारासाठी दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी दोन महिला मृत्युमुखी पडल्या होत्या. एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Continues below advertisement

Nilesh Ghaywal News : निलेश घायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज

निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याचा जामीन अर्ज रद्द करावा या मागणीसाठी पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे. 2021 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात गायवळ याला 2022 मध्ये जामीन अर्ज मंजूर झाला होता. मात्र यामध्ये असलेल्या अटी शर्तीचे पालन न केल्यामुळे त्याचा अर्ज रद्द व्हावा, अशी मागणी करत पोलिसांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे.

हेही वाचा